प्रतिनिधी / चांदुर बाजार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्ष आदेशावरून चांदुर बाजार येथे हिंदी सक्ती विरोधात शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला शासनाने पहिली ते चौथ्या वर्गापासून हिंदी विषय शिकवणी सक्तीची करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील मराठी नागरिकांना संपवण्याचा घाट या सरकार ने घातला आहे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करीता आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, उपजिल्हा प्रमुख आशिष वाटाने, तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना प्रमुख रोशन जयसिंगपूरे, उप तालुका प्रमुख अनिल सायंदे, संभाजी ब्रिगेट तालुका प्रमुख प्रतीक काटोलकर, विभाग प्रमुख दादाराव तायडे, विजय घुलक्षे, देवेंद्र औतकर, मोहित राऊत, विक्रम फुकट, मनीष राठी, चकधर पेठे, मंगेश सपधरे, प्रशांत खुंटे, अमोल गाडगे, संजय शिंदे, शंकरराव भेटाळू, कुशल भेटाळू, रोशन राठोड, बंडूभाऊ ठेसे, करण हरसूले, मनोज साबळे, नवनीत दिडलकर व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक यावेळी उपस्थित होते