अमरावती शहरातील नेक्स्ट लेवल मॉलमधील ‘SPA 99’ या मसाज सेंटरमध्ये गुन्हे शाखेचा छापा

Oplus_16777216

 

 

अमरावती शहरातील नेक्स्ट लेवल मॉलमधील ‘SPA 99’ या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ₹१,१४,७००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून, मुख्य व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे.

सदर स्पा सेंटरचा मूळ मालक राकेश रावल (रा. रतलाम, मध्यप्रदेश) असून, दुकानाचा भाडेकरू मालक अभिनीत दिलीप लोखंडे (वय ३८, रा. रहाटगाव, अमरावती) हा सध्या फरार आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी केले असून, त्यांच्या पथकात सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, एएसआय महेंद्र येवतीकर, तसेच महिला पोलीस कर्मचारी व पंच यांचा समावेश होता