Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न ; मानाचे वारकरी ठरले उगले दाम्पत्य

मानाचे वारकरी श्री. कैलास दामु उगले,( वय ५२), सौ. कल्पना कैलास उगले, वय (४८)
मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक
व्यवसाय : शेती

 

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली

.आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले या भाविकाला महापूजा करण्याचा मान मिळाला.

कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात.