मोदीनगर येथील बाल संस्कार शिबिराचा समारोप

65

संस्कार आणि पर्यावरणाचे जतन काळाची गरज :– डॉक्टर अभय गोयनका

शेगाव ;– आजच्या या काळात मोठ्या शहरांमध्ये साधे श्लोक शिकण्याकरिता मोठी रक्कम मोजावी लागत असताना आपण मोदीनगरवाशी फार भाग्यवान आहात आपल्याला डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या माध्यमातून तुमच्या बालमनावर एवढे चांगले संस्कार केल्या जात आहे. आज पैसा मोजूनही सर्व संस्कार विकत मिळत नाही ते तुम्हाला सहजरीत्या या ठिकाणी उपलब्ध होत आहेत ही फार अभिमानाची बाब असून सध्या मी पर्यावरण व संस्कृतीचे जतन यावर कार्य करीत असून असे संस्काराचे शिबिर वारंवार सर्व भागात व्हावे कारण संस्कार संस्कृती आणि पर्यावरणाचे जतन ही आता काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत मागील महिनाभर सुरू असलेल्या बाल संस्कार शिबिराच्या समारोपीय सोहळ्यात सुप्रसिद्ध दंततज्ञ डॉक्टर अभय गोयनका यांनी मांडले.
दिनांक ८जुलै मंगळवार रोजी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या द्वारे संचालित जय तुळजा भवानी बाल संस्कार वर्गाचा समारोपीय भव्य सोहळा संध्याकाळी ८वाजता मोदीनगर येथील सोपीनाथ महाराज मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय प्रचारक स्वप्निल राऊत, डॉ. हरीश सराफ व डॉ. अभय गोयनका ,समिती प्रमुख दामोदर परकाळे उर्फ अण्णा व जय तुळजाभवानी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते पद्माकर माळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने झाली असून महिन्याभरात परिसरातील मुले व मुली जे ,जे शिकले त्याचे प्रात्यक्षिक करीत सुंदर सादरीकरण केले त्यामध्ये गीत गायन ,गीतेतील श्लोक ,मनाचे श्लोक, टाळ मृदुंगांचा गजर, पावल्या ,फुगड्या, महाभारत वर नाटिका,भक्ती गीतावर नृत्य अशा विविध प्रकारे संस्कारमय सादरीकरण करण्यात आले .
यावेळी विशेष उपस्थितीत वंचित चे माजी शहर अध्यक्ष राजेंद्र शेगोकार ,ॲड.अतुल देशमुख, विठ्ठल मिरगे, जिल्हा सेवाप्रमुख शंकर टेडे, नगर कार्य व आशिष पांडे जय तुळजाभवानी मंडळाचे सदस्य प्रमोद चव्हाण केशव लांजुळकर रामेश्वर चव्हाण राजू केनकर बाळू हेरळकर महादेवराव ठेंग आणि संध्या गणेश, कु. रेणुका ठोंबे गौरी पिंपळकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार नानाराव पाटील यांनी केले तसेच प्रस्ताविक मध्ये दामोदर परकाळे यांनी या संस्कार शिबिरा चा उद्देश स्पष्ट केला यावेळी मोदी नगर व परिसरातील महिला बालगोपाल व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संस्कारातून आम्ही घडलो तुम्हीही मोठे व्हा:– डॉ. हरीश सराफ

आज मी जे काही आहो ते फक्त या अशा संस्काराच्या जतनामुळे बालपणापासून आईने दिलेले संस्कार व संघ संस्कृतीचे जतन करत या उंचीवर पोहोचलो या संस्काराचा अंगीकार करीत आम्ही घडलो तसेच तुम्ही पण मोठे व्हावे अशी अपेक्षा हृदय तज्ञ डॉक्टर हरीश सराफ यांनी यावेळी व्यक्त केली.

‘ संस्कार ‘ हा मानवाचा सर्वात मोठा ‘ दागिना ‘ :— स्वप्निल राऊत
छोट्या छोट्या गोष्टीतून आपली संस्कृती आपल्याला संस्कार शिकवत असते ते शिकणे फार महत्त्वाचे असून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला संस्कार दिलेले आहेत. त्याची जपणूक करीन वाढदिवस हा संस्कृतीतून संस्कार मय साजरा करावा कारण संस्कार हा मानवाचा सर्वात मोठा दागिना असल्याचे मार्गदर्शन विभागीय प्रचारक स्वप्निल राऊत यांनी या वेळी केले.