आज सातव्या दिवसाची सुरुवात काळी दौ. (ता. महागाव) येथून झाली. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं – यात्रेत सहभागी आंदोलकांनी शेतात उतरून निंदणाचं काम केलं आणि मग पुढील प्रवासाला प्रारंभ केला.
शेतकऱ्यांच्या दुःखाशी एकरूप होत त्यांच्या श्रमात स्वतःला सहभागी करून घेतलेला हा क्षण सामाजिक बांधिलकीचं अनोखं उदाहरण ठरला. पुढे ७/१२ कोरा यात्रा आपल्या निर्धारासह न्यायासाठीचा प्रवास करत राहणार… – Bachhu Kadu






