अ भा ब्राह्मण महासंघ सदभावनेसाठि काम करत आहे
अंजलीताई जोशी
शेगाव: काहि असामाजिक तत्व समाजासमाजात भेद करुन आपसी द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याला अ भा ब्राह्मण महासंघ आपल्या क्रुतीतून सकारात्मक उत्तर देत सदभावना निर्माण करण्याचे काम करत आहे असे अ भा ब्राह्मण महासंघाच्या शेगाव शहर महिला आघाडिच्या अध्यक्षा सौ अंजलीताई दिलीप जोशी यांनी म्हटले आहे
ब्राह्मण महासंघ शाखा शेगाव च्या वतीने दरवर्षि गुणवंतांचा सत्कार समारंभ घेण्यात येतो यंदाहि हाँटेल विघ्नहर्ता येथे आयोजीत सत्कार समारंभात त्या बोलत होत्या
यावेळी मंचावर अ भा ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशात उपाध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी ,जिल्हाध्यक्ष किशोर मिश्रा,शहराध्यक्ष विजय जगधन , माजी सभापती पवनसेठ शर्मा अम्रुत आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक जिग्नेव कमानी आदि मान्यवर उपस्थीत होते
यावेळी बोलताना जोशी म्हणाल्या कि देशाच्या प्रगती साठि समजासमाजात सामजस्य गरजेच आहे एकमेकांच्या प्रती आदर भाव सामाजीक शांतता व सलोखा ठेवण्यासाठी अ भा ब्राह्मण महासंघ सदभावने साठि काम करत आहे विद्यार्थी व युवकांनी आपल्या ध्येयपुर्ती साठि अथक व योग्य दिशेने प्रयत्न करावे व राष्ट्राची सेवा करावी असेहि त्या म्हणाल्या
अम्रुत चा उपयोग करुन घ्या!
जिग्नेश कमानी
महाराष्ट्र सरकारने खुल्या प्रवर्गातील 27जाती साठि अम्रुत आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वीत केले आहे यामधे विद्यार्थासाठि स्काँलरशिप व फि परतावा सारख्या भरपुर योजना आहेत तसेच स्पर्धा परीक्षा परदेशी शिक्षण स्क्लि शिक्षण सारख्या तसेच उद्योगासाठि मोठ्या प्रमाणावर योजना आहे याचा उपयोग ब्राह्मण समाजा सह ईतर खुल्या वर्गातील 27जातींनी स्वतः च्या प्रगतीसाठी करून घ्यावा असे आवाहन अम्रुत आर्थीक विकास महामंडळाचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगीतले
पतांजली योग शिक्षक सेवकांचा शेगाव मधे नि:शुल्क योग प्रशिक्षण निरंतर गेली कित्तेक वर्ष देत असल्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम व विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी या़चा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेवती जगधन यांनी केले
गणेश वंदना कुमारी सान्वी प्रसाद तापी या बालीकिने कथ्थक वर सादर केले.
प्रास्ताविक प्रा भूषण महाजन यांनी केले आभार विजय जगधन यांनी मानले.






