# मराठा पाटील युवक समिती शेगावचा स्तुत्य उपक्रम
# 15 पेक्षा जास्त कंपन्या शेगांव मध्ये होणार दाखलकाहींची जागेवरच होणार निवड प्रक्रिया
शेगाव :– मराठा पाटील युवक समिती कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्याचाच एक भाग दिनांक १९ जुलै २०२५ रोजी स्थानिक वर्धमान भवन शेगांव येथे मराठा पाटील युवक समिती शेगावच्या वतीने युवकांसाठी हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे .
मराठा पाटील युवक समिती वधुवर परिचय मेळावा ,सोयरिक पुस्तिका , ना नफा ना तोटा तत्वावर ॲम्ब्युलन्स सेवा ,रक्ताची मदत करत रक्तदान गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रम असतात, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता आज सामाजिक विषयात तरुणाई मध्ये असलेल्या बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेऊन आज समाजातील तरुणाई व्यवसाय नसल्याने काळजीत आहे त्याच सोबत देशाचे भविष्य म्हणजे आजची तरुण पिढी आहे ,युवक समिती कायम सर्वच क्षेत्रासाठी काम करत असते आणि हाच विचार मनामध्ये घेऊन पहिल्यांदा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून मराठा पाटील युवक समिती शाखा शेगांव यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला नाशिक छत्रपती संभाजी नगर पुणे येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, तसेच स्मॉल फायन्स विविध लहान मोठ्या बँक ,स्थानिक MIDC, आणि परिसरात असणाऱ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असे नियोजन समिती कडून करण्यात आले आहे ज्या मध्ये महिला, पुरुष ,युवक ,युवती यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे , प्रत्यक्ष काही युवक युवती यांची निवड याच कार्यक्रमात करून जोइनिंग लेटर दिले जाईल अशी माहिती आयोजन समिती कडून मिळाली आहे.
सदर मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे ,






