शेगाव:- दिनांक ३ ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांनी अवयव पंधरवडा साजरा होत आहे.
याच हेतूने स्व.बी.एस देशमुख इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनसामान्यांना संदेश देत संत नगरी शेगावमध्ये रॅली काढली यामध्ये स्थानिक सामान्य रुग्णालय सईबाई मोठे मधील डॉक्टर तथा कर्मचारी वृंद यांची सुद्धा साथ लाभली या दोघांच्या सोबतीने ही संदेश रॅली अग्रेसन चौक ते शिवाजी महाराज चौक व नंतर रुग्णालयामध्ये याची सांगता झाली. यामध्ये विद्यार्थी अवयव दान श्रेष्ठदान अशी घोषणा करीत होती .अवयव दानाने येणार क्रांती,अवयव दान हे एक दयाळ कृती, असे अनेक वेगवेगळे पोस्टर हातात घेऊन विद्यार्थी संदेश देत होती.
त्यानंतर ही रॅली सामान्य रुग्णालय मध्ये गेली असता तेथील डॉक्टर व कर्मचारी यांनी एक छोटेखाणी कार्यक्रम आयोजित केला व आपल्या रुग्णालयातील असलेल्या सुविधांबद्दल थोडक्यात माहिती दिली त्यानंतर प्रास्ताविका करताना सार्वजनिक आरोग्य परिचारिका मनीषा बंड यांनी रुग्णालया विषयी पूर्व इतिहास सांगितला. या कार्यक्रमा वेळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर,कर्मचारी वृंद, पत्रकार यांना राखी बांधव रक्षाबंधनाचा सोहळा सुद्धा साजरा करण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे,अधिसेविका मालती प्रधान, सहा अधिसेविका सुनंदा भाकरे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका मनीषा बंड, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी मिलिंद कस्तुरे, रक्तपेढी अधिकारी घनशाम इंगळे, घोरड, निकम, आधीपरिचारिका विशाखा सिरसाट, साधना आंध्याल, निर्मला चव्हाण, सुषमा हिवाळे, सुनंदा फुसे, वर्षा काळे, माधुरी वडोदे, कमल शिंदे, वैशाली, कविता ह्या सर्व परिसेवीका तसेच स्व. बी. एस. देशमुख इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. शेवटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुलांचे कौतुक करत शाळेचे आभार मानले व अशीच लोकहिताची कार्यक्रम पुढे करत राहावी व जनसामान्यांमध्ये जनजागृती होत राहवी यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे संचालन ब्रदर सनत वराळे तर पूजा गावंडे यांनी आभार मानले.
Home Uncategorized स्व.बी.एस देशमुख इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अवयव दानाचा संदेश देत रक्षाबंधन सुद्धा केले...






