सर्वोदय विद्यालय पतसंस्था ची आमसभा संपन्न

154
जाहिरात

सिंदेवाही ता. प्र.-सर्वोदय विद्यालय सहकारी पतसंस्था सिंदेवाही ची आमसभा नुकतीच सर्वोदय महाविद्यालयात संपन्न झाली. पतसंस्था चे अध्यक्ष प्रा देवासे सर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली.
पतसंस्था कडून 10 वी 12 वी पदवी शिक्षणात प्रथम द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव यावेळी करण्यात आला. 2018-19 या सत्रात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी यांचा यावेळी सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आर्थिक दृष्टीने कमजोर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश सुद्धा संस्थे कडून वाटप करण्यात आला. सचिव श्री शिवणकर सर यांनी अहवाल वाचन करून प्रत्यक्ष आमसभेला सुरुवात केली. संस्था अध्यक्ष प्रा देवासे सर यांनी सभासदांच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊन समाधान केले. खेळीमेळीचे वातावरनात पार पडलेल्या या आमसभेची सांगता श्री गोविंद चचाने यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. संचलन प्रा खोब्रागडे यांनी केले. आमसभा यशस्वी करण्यासाठी प्रा सोनवाणे, प्रा नागलवाडे, श्री अतुल केंकरे, आनंद मेश्राम, कु मनीषा परवते, कु जयश्री यादव, सहाय्यक महेश सोनटक्के, लिपिक श्री चांद्रगिरीवर यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।