*सेदानी इंग्लिश स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा-भारतिय सैन्यातील लष्करी जवान विशेष पाहुने*

215
जाहिरात

 

*सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रम*

आकोटः ता.प्रतिनिधि

स्थानिक पोपटखेड मार्गावरील लेट.दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कुलमध्ये ७३ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यास भारतिय सैन्यातील लष्करी जवान अक्षय वसु यांची प्रमुख पाहुने म्हणुन विशेष उपस्थिती होती.स्वातंत्र्य दिनानिमित्य सकाळी सुरेश सेदानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे शिरीष वंजारा , भानुभाई सेदानी , कीशोर सेदानी , संस्थाध्यक्षा सौ.स्मिता सेदानी , नितुल सेदानी , पुनम सेदानी प्राचार्य विजय भागवतकर मुख्याध्यापक प्रशांत मंगळे , प्राथ. मुख्याध्यापक स्नेहल अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त कैले.यावेळी बोलतांना शिरीष वंजारा यांनी लेह लद्दाख सारख्या दुर्गम भागातील सैनिकांच्या सुरक्षा कार्या विषयी माहीती दिली.तर लष्करातील जवान अक्षय वसु यांनी सिमेवर राष्ट्र सुरक्षेत आम्ही कायम तत्पर असु असे सांगीतले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता सेदानी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कर्तव्य व राष्ट्रीय एकात्मतेबाबत मार्गदर्शन केले.यानंतर वर्ग १ते ४ आणी वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत.तसेच यावेळी वर्ग १ते ८ च्या विद्यार्थ्यांनी ईंग्रजीतुन आपले विचार व्यक्त केलेत.स्कुलचे क्रीडा शिक्षक सुजय कल्पेकर यांच्या टीमने राज्य.सॉफ्टबॉल स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासोबतच रक्षाबंधन सण असल्यामुळं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या ह्या विशेष पाहुणे लष्करी जवान अक्षय वसु यांना बांधल्यात.तसेच सिमेवरील ईतर सैनिक बांधवांसाठी या राख्या पाठवण्यात आल्या.

तर शिक्षकांच्या वतीने सुजय कल्पेकर यांनी विचार मांडले. .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिनल शिरस्कार यांनी तर आभार प्रदर्शन शितल खारोडे यांनी केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारींनी परीश्रम घेतलेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।