टेकरी(तु) येथील तलावाच्या बोडीची पाळ फुटली…शेतकऱ्यांचे व मच्छीचे नुकसान

168
जाहिरात

सिंदेवाही ता. प्रतिनिधी :- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जवळील टेकरी तु येथील बोडीची पाळ फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तालुक्यातील टेकरी तु येथील बोडीची पाळ आज सकाळच्या सुमाराला फुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ गावातील नागरिकांनी बोडीकडे धाव घेतली. बोडीच्या पाण्याचा वेग अतिशय असल्याने बोडीखालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच बोडीमध्ये मच्छीमारीसाठी मासे सोडली होती. तीसुद्धा पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी उपसभापती विरेंद्र जैस्वाल व प स सदस्य राहुल पोरेड्डीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देवून पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तसेच बोडीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा अनेक शेतकरीवर्गाला नुकसान सहन करावे लागले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।