कावड स्पर्धा २०१८ चे थाटात बक्षिस वितरण-महेश गणगणे मित्र परीवाराचे सलग ७ वर्षापासुन आयोजन

223
जाहिरात

आकोटः ता.प्रतिनिधी

महेश गणगणे मित्र परीवाराच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कावड स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच अकोट येथील मारोती मंगल कार्यालय टाकपुरा येथे पार पडला. अॅड महेश गणगणे यांच्या हस्ते यावेळी वर्ष २०१८ च्या विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षापासुन दरवर्षी कावड मंडळांसाठी बक्षिस स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून श्रावण मास कावड उत्सव समितीचे अध्यक्ष संजय शांतारामजी गोरे,उपाध्यक्ष विपुल लोणकर,सचिव वस्ताद दिगांबर सोळंके आणि बजरंग दलचे सुनिल देठे उपस्थित होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानी महेश दादा गणगणे लाभले होते.

या स्पर्धेचे प्रथम पारीतोषिक ७७७७ रूपये हे नंदिकेश्वर शिवभक्त मंडळाने पटकावले तर व्दीतीय पारीतोषिक ५५५५ रूपये जय भवानी शिवभक्त मंडळाने पटकाविले,तृतीय पारीतोषीक ३३३३ हे शनिवारा ग्रुप शिवभक्त मंडळाने पटकाविले उत्तेजनार्थ पारीतोषिक हे गजानन शिवभक्त मंडळ आणि श्रावणबाळ शिवभक्त मंडाळाला देण्यात आले.

कावड यात्रेमधील शिवभक्त मंडळांचा उत्साह वाढावा याकरीता या बक्षिस समारंभाचे आयोजन गेल्या सात वर्षांपासून अॅड महेश गणगणे मित्रपरीवारामार्फत करण्यात येते,यामध्ये कावड यात्रेतील शिवभक्तांची शिस्त,त्यांचे नियोजन,सजावट इत्यादी बाबी तपासुन या बक्षिसांचे वितरण केले जाते.

कार्यक्रमाचे संचलन प्रतिक गोरे तर आभारप्रदर्शन विशाल राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्मित पवार,केशव हेड,प्रकाश मंगवानी,सनि चौधरी,मयूर निमकर आणि महेश गणगणे मित्रपरीवारातर्फे परीश्रम घेतले गेले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।