पंचायत समिति सिंदेवाही चा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर, तक्रारीचे चौकशीसाठी लागले ३८४ दिवस

235
जाहिरात

तालुका प्रतिनिधि – सिंदेवाही पंचायत समिति अंतर्गत खातगाव ग्रामपंचायत ला सन २०१३/२०१४ मध्ये तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव घोषित करून, १,००,०००/- लाख रुपये पुरस्कारस्वरूप देऊन सम्मानीत करण्यात आले. पुरस्कार रकमेचा धनादेश मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचेकडून दिनांक – १८/५/२०१५ रोजी खातगाव ग्रामपंचायत ला प्राप्त झाला. ज्याचा धनादेश क्र. – ६९७७०७ असा असुन, जमा रकमेचा विनीयोग शासकीय परिपत्रकानुसार न करता संपूर्ण रकमेची अफरातफर सरपंच व तत्कालीन सचिव यानी केल्याचे लक्षात आल्यावर श्री. भगवंत पोपटे, सिंदेवाही यांनी दिनांक – १६/०७/२०१६ ला माहितीचे अधिकारात माहिती मागितली असता कार्यरत सचिव श्री. चाहांदे यांनी माहिती देन्यास टाळाटाळ केली. त्यांचेनंतर श्री. निखिल डांगे हे ग्रामपंच्यात खामगाव येथे सचिव पदावर रुजू झाले. त्यांनीही माहिती देन्यास टाळाटाळ कली. त्यामुळे प्रथम अपिलीय अधिकारी पंचायत समिति सिंदेवाही यांचेकडे दिनांक – ६/९/२०१६ ला अपिल अर्ज करूण माहिती मागविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु सचिव ग्रामपंचायत खातगाव हे अपिल सुनावणीला हेतुपुरस्सर गैरहजर राहिले. त्यामुळे दि. २८/९/२०१६ ला सुनावणी होऊन सचिव ग्रामपंचायत खातगाव यांनी तात्काळ अर्जदाराला विनामूल्य माहिती उपलब्ध करूण द्यावी, असा निर्णय प्रथम अपिलीय अधिकारी श्री. ए. के. शामकुळे यांनी सुनावणीनंतर निर्णय देण्यात आला असतांनाही संमंधीत कार्यरत सचिव श्री. आर. आर. चहांदे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांचे सुनावणीचे निर्णयाला केराची टोपली दाखवली असल्याने, अर्जदाराने द्वितीय अपिल मा. माहिती आयुक्त, नागपुर यांचेकडे करूण माहिती मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावरून दिनांक २५/७/२०१८ ला माहिती आयुक्त यांचे कार्यालयात सुनावणी वेळी कार्यरत सचिव श्री. निखिल डांगे, सचिव व श्री. ए. के. शामकुळे, विस्तार अधिकारी (पंचायत) हे सुनावणीला प्रत्यक्ष हजर होते. झालेला प्रकार सुनावणी मध्ये सांगितला असता, माहिती आयुक्तांनी सात दिवसांत माहिती उपलब्ध करून देण्यास बजावले व अर्जदारास मानसिक त्रास व येन्याजान्यास झालेला त्रास म्हणून अर्जदारास भरपाई म्हणून २०००/- रुपये संमंधीत सचिव श्री. आर. आर. चहांदे यांचे पगारातून देन्याबाबत, तत्कालीन विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. ए. के. शामकुळे यांना आदेशानुसार कळविण्यात आले असतांनाही माहिती देन्यास कार्यरत सचिव श्री. निखिल डांगे यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे अर्जदाराने नाईलाजास्तव संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिति, सिंदेवाही यांचेकडे दाद मागण्यासाठी व संमंधीत पुरस्कार रकमेच्या अफरातफरी चौकशी होऊन योग्य ती कारवाई होन्यासाठी दि. ०१/०८/२०१८ रोजी लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली. परंतु संमंधीत चौकशी अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. अनिल शिंदे यांनी येनकेन प्रकारे कारणे सांगून व चौकशीसाठी नेहमीच टाळाटाळ करून चौकशी लांबविली. यावरून कुठेतरी पाणी मुरत असल्याने चौकशीसाठी उशीर होत आहे असे लक्षात आले. संमंधीत चौकशी अधिकाऱ्यांनी अंदाजे ११ महिन्याचे कालावधी नंतर चौकशी केलेल्या प्रकरणाचा चौकशी अहवालात मा. संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिति सिंदेवाही यांचेकडे स्वाक्षरीसाठी ठेवला असता, संवर्ग विकास अधिकारी श्री. अशोक ईल्लूरकर यांनी चौकशी अहवालात तृटी काढून दुरूस्तीसाठी चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवून दुरूस्ती नंतर चौकशी अहवालावर संवर्ग विकास अधिकारी अशोक इल्लूरकर यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, चंद्रपुर यांचेकडे जा. क्र./पससिं/पंचायत /वि. अ. /चौक /१११४/२०१९ कार्यालय गटविकास अधिकारी पंचायत समिति, सिंदेवाही यांचेकडून दिनांक १९/०८/२०१९ ला चौकशी अहवाल पाठविण्यात आला असल्याबाबत अर्जदारास कवरिंग लेटरची सत्यप्रत दिनांक २३/०८/२०१९ रोजी पंचायत समिति सिंदेवाही चे कार्यालयात प्रत्यक्ष दिली. त्यामुळे आधीच प्रकरणाची चौकशी होऊन चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत) जिल्हा परिषद चंद्रपुर यांचेकडे पाठवायला ३८४ दिवस लागले. आता चौकशी अहवालावर चौकशीअंती कारवाई साठी किती दिवस लागतात या प्रतिक्षेत अर्जदार यांनी वाट ंबघण्याशिवाय गत्यंतरच नाही. अशाप्रकारे पंचायत समिति सिंदेवाही चा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।