सेदानी इंग्लिश स्कुलमध्ये जन्माष्टमी व दहीहंडीची धमाल

219
जाहिरात

आकोटः प्रतिनिधी-

स्थानिक पोपटखेड मार्गावरील लेट दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कुल व ज्यु.कॉलेजमध्ये शनिवार दि.२४ ला कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.

यावेळी जन्माष्टमी व दहीहंडी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलेत तसेच विद्यार्थ्यांच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत गित गोविंदा साजरा केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा स्मिता सेदानी , प्राचार्य विजय भागवतकर मुख्याध्यापक प्रशांत मंगळे प्रार्थमिकच्या मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर यांची मंचावर उपस्थिती होती.सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले.यानंतर वर्ग २ व ४ च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माचा जिवंत देखावा नृत्यातुन सादर करण्यात आला.तर वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यानी कृष्ण व राधेतील माखनचोरीचा प्रसंगावर नृत्य सादर केले.तर बाल गोविंदांनी मानवी मनोरेचे थर लावुन दहीहंडी फोडुन जल्लोष साजरा केला.प्राचार्य विजय भागवतकर यांच्या सुमधुर बासरी वादनाने सर्व अवाक झाले होते.दहीहंडी पश्चात सर्वाना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले.तर मुख्याध्यापक प्रशांत मंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले.शिक्षकांच्या वतीने हर्षा वाळके यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष विणके, स्नेहा गुप्ता यांनी तर आभार प्रदर्शन पवार मँडम व जमिल शेख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतलेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।