दापोरी येथील विद्यार्थ्यांनी केले  ईव्हीएमवर मतदान -बालसंसद  निवडनूकीत १८९ विद्यार्थ्यांनी केले मतदान

176
जाहिरात

 

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम ! 

रुपेश वाळके / मोर्शी –

शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण व्हावा. तसेच त्यांना निवडणूक प्रक्रियेची इत्यंभूत माहिती व्हावी यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक दापोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ईव्हीएमवर मतदान पद्धतीने पार पडली. निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी यांनी केली.

निवडणुकांची तारीख जाहीर झाली. आपापल्या गटांकडून उमेदवार उभे केले गेले. दणकेबाज प्रचार करण्यात आला. निवडणुकीची प्रक्रिया सर्वांना समजावी आणि निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जागृतीही झाली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस उजाडला आणि इव्हीएम मशीनवर मतदान पार पडले. निकाल लागला अन् एकच जल्लोष झाला. गुलालाच्या उधळणीत नवा मुख्यमंत्री निवडला गेला…

हे चित्र पाहून मुदतपूर्व निवडणुका झाल्या की काय, असा प्रश्न पडेल. अशी विशेष निवडणूक झाली  मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेत  ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचा धडा गिरवला.

जिल्हा परिषद शाळा स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची निवडणुक घेतली जाते. हात वर करून विद्यार्थी आपले नेते निवडतात. यात आता बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना ईव्हीएमव्दारे होत असलेल्या निवडणुक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी  ईव्हीएमव्दारे मतदान घेण्याची संकल्पना मांडली. शाळा व्यवस्थापन समिती , तहसीलदार गणेश माळी ,आणि मुख्यध्यापकांसह सर्वांनी यास होकार दिला.

ईव्हीएमवर मतदान पद्धती वापरून  सुरू झाली शालेय मंत्रिमंडळाच्या इलेक्शनची तयारी. एक बॅलेट आणि एक कन्ट्रोल युनिट तयार करण्यात आले. शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि इतर मंत्र्यांचा समावेश असतो. या पदासाठी होत असलेल्या मतदान प्रकियेसंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.  इच्छुक विद्यार्थ्यांनी आपापले नामांकन अर्ज सादर केले. सुट्टयांच्या दिवसात त्यांना प्रचार करण्याची संधी देण्यात आली.तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी नेत्यांनाही लाजवतील, असे प्रचाराचे फंडे वापरले.

प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी  मुख्याध्यापक गजानन चौधरी यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. केंद्राधिकारी प्रमोद खंडेतोड  , मतदान अधिकारी म्हणून दिनेश श्रीराव , रवींद्र भूकटे ,विजया पुंड , पुष्पा काळे मंडळ अधिकारी माइंदे , तलाठी शिरभाते  यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती .

विद्यार्थी मतदारांनी हिरीरीने आपआपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर बटन दाबत मतदान केले. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्यांनतर निवडणुक मतदान अधिकाऱ्यांनी  मोबाईल ईव्हीएमव्दारे झालेले मतदान घोषित करीत मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाकरिता सोहम वाट यांची बिनविरोध निवडणूक पार पडली , मंत्रीमंडळामध्ये शीक्षण मंत्री कोमल मस्के , आरोग्य व स्वच्छता मंत्री उन्नती राऊत , क्रीडा मंत्री तन्मय दोडके , हजेरी मंत्री श्रेया अंधारे , सहल व पर्यटन मंत्री तृप्ती बारापत्रे , सांस्कृतिक मंत्री अथर्व राऊत , जानव्ही जिचकार , अर्थ मंत्री सानिका फलके , पाणी पुरवठा मंत्री राम फलके , न्याय व शिस्त मंत्री मयुरी वानखडे , चैतन्य भिंगारे , यांची निवड करण्यात आली .

शाळेतील १०६ मुले , ८३ मुली अश्या एकूण १८६ मतदारांनी आपला हक्क बजावला त्यात निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित करताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. याच पध्दतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत इतर मंत्र्यांचीही निवड करण्यात आली. शाळेत पार पडलेल्या या आगळयावेगळया निवडणुकीने गावातही निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते. या लई भारी इलेक्शनची चांगलीच चर्चा आता गावात रंगली आहे.

प्रेरणादायी अनुभव…
विद्यार्थ्यांना आपल्या निवडणूक प्रकियेची माहिती व्हावी या हेतूने तहसीलदार गणेश माळी यांनी मला ही संकल्पना सुचली आणि आम्ही ती प्रत्यक्षात राबविली. हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरला.
– गजानन चौधरी  मुख्याध्यापक , 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।