तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलननाने रखडले शेतकरी,सामान्यांची कामे.

159
जाहिरात

तालुका प्रतिनिधि -महसुल कर्मचारी यांच्या अनेकदा केलेल्या मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळकाढू पनाचे धोरण अवलंबिले असल्याचे निदर्शनास आले असल्याने आपले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असतांनाच अतिवृष्टी व उद्भवलेल्या पुरपरिस्थीमुळे त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहून मदत केल्याने पुढील आंदोलनाचे तारखेत बदल करावा लागला आहे. त्याला प्रतिसाद देन्यासाठी सिंदेवाही तहसील कार्यालयातील महसुल कर्मचारी व राज्य महसुल कर्मचारी संघटना यांच्या आंदोलनाचे तारखेत झालेला बदल पुढील प्रमाणे.

१) दिनांक – २८/८/२०१९ रोज    बुधवारला सामुदायिक रजा  टाकून धरणे आंदोलन

२)  दिनांक – ३१/८/२०१९ रोज शनिवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप

३) दिनांक – ५/९/२०१९ रोज गुरुवार पासून पुढे बेमुदत संप पुकारला आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या न्यायिक व प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अशा रीतीने राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत असून जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .त्यामुळे सिंदेवाही तहसील कार्यालयातील महसूल  कर्मचाऱ्यांनी  त्याप्रकारचे मागण्यांचे निवेदन सिंदेवाही चे  तहसीलदार श्री. अमोल पाठक यांना महसुल कर्मचारी, तहसील कार्यालय सिंदेवाही यांचेकडून देण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।