विध्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांचे विचार अंगिकारावे -प्राचार्य गजानन निमकर्डे

166
जाहिरात

आकोट: स्थानिक गणगणे विद्यालयामध्ये हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गजानन निमकर्डे यांनी ‘विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात खेळ जोपासले पाहिजे महान आदर्श ठेवला पाहिजे तसेच देशाचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे विचार अंगिकारावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उद्धवराव गणगणे,अरविंद लहाने,अनिल काकडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पूजन व हारार्पणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे तर आभारप्रदर्शन समाधान ढाकणे यांनी केले.
कार्यक्रमाला धनंजय वांगे यांच्यासह
शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थित होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।