राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री नितीन शेगोकार यांना जाहीर

228
जाहिरात

आकोट.:संतोष विणके-

आकोट तालुक्यातील श्री.सरस्वती विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक नितीन सुरेश शेगोकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री सरस्वती विद्यालयाची स्थापना १९६८ साली असून स्थापनेपासून प्रथमच राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार शाळेच्या शिक्षकाला  मिळाला आहे.

समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षकास पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येतो. तो सन्मान श्री सरस्वती विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक नितीन सुरेश शेगोकार यांना प्राप्त झाला आहे.

दि.५ सप्टेंबर  ला  शिक्षक दिनानिमित्त  नितीन शेगोकार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या हस्ते रंग शारदा सभागृह, बांद्रा ,मुंबई येथे होणार आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे . श्री सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष अॅड मोहनराव आसरकर व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक भुषण ठाकूर, पर्यवेक्षक संगिता धर्मे व शिक्षक वृंद ,कर्मचारी वर्ग यांनी सरांचे कौतुक करून अभिनंदन केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।