एफ एम काशेलानी स्कूलचे विद्यार्थी वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम!
शेगाव:- स्थानिक एफ एम काशेलानी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत कु. रश्मी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक, कु. वेदांती पारोडे हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक, कु. श्रुती वाकळे हिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक, तर कु. स्नेहल कापसे हिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले. यापैकी सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थिनी कु. रश्मी इंगळे आणि वेदांती पारोडे यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी सर, संचालक कुणाल काशेलानी सर, सहसंचालक शुभम देशमुख सर, सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी मॅडम व मुख्याध्यापिका योगिता गावंडे मॅडम यांनी क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
“माझ्या प्रशिक्षणाखालील विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत मिळवलेले यश हे माझ्यासाठी, शाळेसाठी आणि पालकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा विजय केवळ त्यांच्या परिश्रमाचा परिणाम नसून त्यांच्या शिस्त, जिद्द आणि समर्पणाचं उत्तम उदाहरण आहे. या यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.”
असे विचार क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर यांनी व्यक्त केले.
सदर स्पर्धा लि. भो. चांडक विद्यालय, मलकापूर येथे पार पडली.





