अधीस्वीकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार

39

अधीस्वीकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार

व्हाईस ऑफ मीडियाने केले संतनगरीत स्वागत

शेगाव : शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीची अमरावती विभागीय बैठक गुरुवारी संत नगरी शेगावात आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये माहिती व जन संचालनालयाचे उपसंचालक, अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ व अमरावतीचे जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी संतनगरीत प्रथमच विभागीय स्तरावरची बैठक आयोजित झाल्याने व्हाईस ऑफ मीडिया शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने सर्वांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
दिनाक ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक विश्राम भवनात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मध्ये अमरावतीचे उपसंचालक अनिल आलूरकर आणि विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे यांचे सर्वप्रथम शाल श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत सत्कार करण्यात आले. यानंतर समितीचे सदस्य राजेंद्र काळे, सुरेंद्र आकोडे, गोपाळ हरणे आणि जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन राठोड अकोला, गजानन कोटुरवर अमरावती, यासृरोद्दीन काझी वाशीम आणि पावन राठोड बुलढाणा यांचा हि सत्कार पत्रकारांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. या वेळी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नानाराव पाटील आणि जिल्हा प्रवक्ते फहीम देशमुख, सचिव ज्ञानेश्वर ताकोते, पदाधिकारी तथा शेगाव प्रेस क्लब चे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, समीर देशमुख, ललित देवपुजारी, जेष्ठ पत्रकार विजय इंगळे, सह शेगावातील पत्रकार अनिल उंबरकर, राजेश चौधरी, संजय त्रिवेदी, खामगावातील पत्रकार अशोक जसवाणी यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन समितीमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पत्रकार राजेंद्र काळे यांची संचलन तर आभार व्हाईस ऑफ मीडिया शेगाव तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांनी मानले.