♦️समृद्धी महामार्गचा खिळ्यांचा घडलेला प्रकार सविस्तर माहिती

1481

काल रात्री चॅनेल 442 वर मुंबई दिशेने सिमेंटरोडचा एक बेल्ट 200 मीटरचा त्यावर ग्राऊंटिंग इंजेक्शन्सचे नोजल्स ड्रिल करून लावले होते ही एक दुरुस्तीची प्रक्रिया आहे ह्यात हे नोजल्स एका सोल्युशन्सने घट्ट काँक्रिट रोडवर बसवले जातात त्याचा अवधी हा 24 तासाचा असतो as माहिती घेतल्यावर कळलं.

इथे काल सकाळी ही मोल्डिंगची प्रक्रिया झाल्यावर ते तसेच फिक्सिंगसाठी बसवले जातात आणी रात्री इथे काही कार्स 3rd जीं ट्रक्सची लेन असते इथून पास झाल्या ह्याने ते अल्यूमिनियमचे नोजल्स कारच्या टायर्समध्ये घुसले आणी ते पंक्चर झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जो दावा केला गेला आहे तो माझ्या चौकशीत काही अंशी खरा आहे पण ह्यात दुसरी बाजू बघितल्यावर समजेल की इथे अनेकदा रोड दुरुस्ती करताना जिथे दुरुस्ती होते तिथे नीट बॅरि्केटिंग केल्यावर कधी ते पडतात किंवा काही मोठ्या गाडयांच्या धक्यामुळे ते बॅरिकेट्स चिरडतात पडतात काही बॅरिकेदा वजनाने हलके असतात ते उडून दुसरी कडे पडतात त्यामुळे हे फिक्स लावणं फिटिंग मजबूत ठेवणं ह्यात मेंटेनन्स कंपनीचा निघ्काळजीपणा समोर आला आहे बाकी दरोडा आणी लूटमारची शक्यता मुळीच दिसून आला नाही.

हे मोल्डिंग्सचे इंजेकटर्स जमिनीत बसवल्यावर ते सरफेस खुप मजबूत वाटले कोणती ही कार ट्रक्स मचे टायर्स सहज फुटू शकतात अस निदर्शनास आले .

जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला छत्रपती संभाजीनगरचे DCP प्रशांत स्वामी आणी दौलताबाद पोलिस स्टेशनचे पोलिसाल निरीक्षक ह्यांनी रात्री पासून इथे बंदोबस्त वाढवला आणी आजबाजूच्या परिसरात त्यांनी चांगली चौकशी करून दुपारपर्यत ते स्पॉटवर होते पण हा प्रकार इंजिनियरिंग मधला कोणाला ही कळला नाही जेव्हा मेघा इंजियरिंगचे इंजिनियर्स राधेश्याम तिवारी आणी अंकित ह्याने सविस्तर माहिती दिली तेव्हा सगळा प्रकार कळला.

 

इथे रात्री कोणी ही दुरुस्ती स्पॉटवर थांबू शकत नाही कारण इथे प्रचंड लूटमार मारहाण करून लुटला जात त्यामुळे जिथे खिळे लावलेले स्पॉटला कोणी ही व्यक्ती थांबून पहारा देण अशक्य आहे ही मोठी भीती आहे दुसरी गोष्ट कोणी तरी इथे येऊन हे खिळे बघून मुद्दाम हे बॅरिकेडस हटवण्याची जास्त शक्यता दिसून आली.
आता सुद्धा दुसऱ्या चॅनलला मेघा इंजियर्सचे लोक तशीच प्रोसेस करत दुसऱ्या बाजूने उभे आहेत त्यामुळे दरोडा ही शक्यता नाही आहे. .

श्री अभिजित(रोड सेफ्टी एक्सपर्ट)