रायफल शूटिंग स्पर्धेत सेंट पॉल शाळेचा चिन्मय इंगळे राज्यस्तरावर

134
जाहिरात

अकोट :ता.प्रतिनिधी–राज्य शासनाच्या क्रीडा विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आलेल्या विभागीय रायफल शूटिंग ( 10 मि. एअर रायफल ओपन साईट) प्रकारात स्थानिक सेंट पॉल शाळेचा वर्ग 8 चा विद्यार्थी चिन्मय सचिन इंगळे हा प्रथम आला असून तो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावती विभागातर्फे खेळणार आहे .

सदर राज्यस्तरीय स्पर्धा कोल्हापूर येथे दिनांक 23 नोव्हेंम्बर रोजी होणार आहे. लहानपणापासूनच वयक्तिक क्रीडा प्रकाराची आवड असणाऱ्या चिन्मय इंगळे ने आपल्या यशाचे श्रेय आजी,आजोबा, आई,वडील व लहान भावाला दिले आहे.
चिन्मय च्या निवडीबद्दल सेंट पॉल शाळेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया ,सचिव प्रमोद चांडक पदाधिकारी लुनकरण डागा ,सौ रेखा चांडक , सौ शारदा लखोटीया ,सौ सुधा डागा मुख्याध्यापक विजय बिहाडे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी उप मुख्याध्यापिका सौ ममता श्रावगी, अमर ठाकूर , प्रभूदास नाथे, कैलास ठाकरे क्रीडा शिक्षक प्रशांत ठोकळ व सर्व विध्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।