चांदुर बाजार तालुक्यात रेती माफियांच्या हैदोस, जप्त केलेल्या वाहनातून वाळूची चोरी.तर भरारी पथक फक्त नावालाच चांदुर बाजार शशिकांत निचत

जाहिरात

चांदुर बाजार तालुक्यात रेती माफियांच्या हैदोस, जप्त केलेल्या वाहनातून वाळूची चोरी.तर भरारी पथक फक्त नावालाच

चांदुर बाजार शशिकांत निचत

चांदुर बाजार तालुक्यातील 24 वाळू घाट लिलाव चे प्रस्ताव तालुका दंडाधिकारी यांनी वरिष्ठ कडे पाठविले असले तरी अवैध वाळू तस्करी करणारे हे कालवा, आणि पाधन रस्त्याचा वापर करून मोठता प्रमाणात आपला व्यवसाय वाढवीत आहे.यात अनेक गावाला जोडणारे मुख्य रस्ते वर क्षमते पेक्षा अधिक भार असलेले वाहन वाहतूक करीत असल्याने अनेक रस्ते हे अल्पशा कालावधी मध्ये खड्डेमय झाले आहे.त्यामुळे यावर सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसील कार्यलाय, आनी पोलीस विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

(पोलिसांची पेट्रोलिंग व महसुलाचे भरारी पथक ठरताहेत कुचकामी)

पोलिसांची पेट्रोलिंग व महसूल विभागाच्या भरारी पथकाला रेतीची चोरटी वाहतुक का दिसत नाही किंवा अधिकारी आणि कर्मचारी पाहून न पाहल्यासारखे करतात हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. दिवसा ढवळय़ा व राजरोषपणे रेतीची वाहतुक सुरू असून कारवाई होत नसल्याने पोलिसांची पेट्रोलिंग व महसूलचे भरारी पथक कुचकामी ठरले.

तर एक महिन्या आधी तहसीलदार यांनी जप्त केलेल्या वाहन हे तहसील कार्यलाय परिसरात जप्त करण्यात आले होते मात्र त्या उभा वाहनांमधून वाळूची चोरी झाल्याने पुन्हा महसूल प्रशासन बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे तर अध्यपही आरोपी याचा शोध घेण्यात चांदुर बाजार पोलिसांना अपयश हाती लागले आहे. या पूर्वी शुद्ध जप्त केलेला वाळू साठा चोरून गेल्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे.त्यामुळे कुपनच शेत गिळत तर नाही अशी चर्चा तालुक्यात महसूल आणि पोलीस विभाग यांच्या दुर्लक्ष भूमिकांमुळे दिसत आहे.

प्रतिक्रिया:-
जप्त केलेल्या वाहनांमधून चोरी गेलेल्या वाळूची तक्रार मी स्वतः पोलीस स्टेशन ला दिली आहे.या आधी शुद्ध तलाठी यांनि चोरी गेलेल्या जप्त केलेल्या वाळू ची तक्रार केली होती.
1)तहसीलदार उमेश खोडके चांदुर बाजार

तहसीलदार यांची तक्रार प्राप्त झाली आहे.तपास सुरू आहे.लवकरच आरोपी अटक करू.
2)उदयसिंग साळूके ठाणेदार चांदुर बाजार

बॉक्समध्ये
*दीड महिन्या आधी जप्त केलेल्या वाहनातून चोरी गेलेल्या वाळूच्या आरोपी पर्यत अध्यापही काहीच सुगावा न लागल्याने आणि चक्क तहसील कार्यलाय मधून वाळू चोरीला गेल्याने तहसील कार्यलाय मधील अनेक कर्मचारी हे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या सोबत संगनमत असल्याचे दिसत आहे.यावर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार यांना आव्हान आहे तर या आधी अशा प्रकार कधीच घडला नाही.*

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।