परवानगी नसताना ही केली झाडाची कत्तल,महावितरण च्या कामासाठी वेगळा न्याय का? परवानगी फक्त फांद्या झटण्याची :-सार्वजनिक बांधकाम विभाग

जाहिरात

चांदुर बाजार :-

माधान ते ब्राह्मणवाडा थडी या रोडवरील महावितरण च्या 11 केव्ही च्या लाइन चे काम सुरू आहे.या रोडच्या बाजूला असलेल्या झाडाची अडचण लक्ष्यात घेता महावितरण चे झाडाच्या फांद्या झटण्याची परवानगी घेतली तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा काही अटीवर त्यांना परवानगी दिली मात्र ठेकेदार यांनी 5 ते 6 झाड जमीनदोस्त तर काही मोठे झाडे पूर्णतः रिकामी केले त्यामुळे या कडे आता वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार हा प्रश्न आहे.

सामान्यतः वृक्ष तोडणे हा गुन्हा आहे मात्र महावितरण साठी वेगळे नियम आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे तर वृक्ष तोडताना उपविभागीय कार्यलाय मधील कर्मचारी त्यांनी ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असताना ते नसताना झाड तोडण्यात आले.त्यामुळे याची जबाबदारी हा प्रश्न निर्माण होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी झाडांना इजा न होता कमीत कमी फांद्या झाटव्या,अश्या अटीवर परवानगी दिली मात्र पूर्ण झाड च कत्तल केल्याने आता कार्यवाही होणार ही नाही हा प्रश आहे.तर तोडलेल्या झाडाचे लाकूड कोणाला माहिती होऊ नये म्हणून लगेच गाडीत भरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नेले जात आहे.

तिकडे बांध्यावरील झाड तोडायला शेतकरी याना परवानगी घ्यावी लागते मग महावितरण कडे परवानगी नसताना झाड तोडले यावर काय कार्यव्याही होणार हे पहावे लागतील.

प्रतिक्रिया:-
झाडाला कोणतीही इजा न होता फांद्या झटण्याची परवानगी दिली आहे.मात्र तरी सुद्धा झाड तोडले जात असतील तर याबाबत महावितरण च्या वरिष्ठ सोबत बोलून त्यांना कळवितो.
1)मिलिंद भेंडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चांदुर बाजार

झाड झटण्याची परवानगी नाही आहे.तरी जर त्यांनी झाड झातले असेल तर त्यांना फोन करून सांगतो.
२)सुधीर वानखडे उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय चांदुर बाजार

आम्ही फांद्या झाटण्याची परवानगी घेतली आहे.तरी जर कामावरून मजूर झाड तोडले असेल तर त्यांना काम बंद करायला सांगतो.
3)साईदिप बोरे ठेकेदार

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।