‘तान्हाजी’ चित्रपट  टॅक्स फ्री करा तसेच सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना हा सिनेमा मोफत दाखवा :- भाजप युवामोर्चा प्रदेश सचिव बादल कुळकर्णी यांची मागणी

300
जाहिरात

अमरावती :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील वीर योद्धा नरवीर तानाजी मालुसरे, ज्यांनी स्वतःच्या मुलाचे लग्न डोळ्या समोर असतांना स्वराज्य चळवळीला प्राधान्य देत ‘आधी लगीन कोंडण्याचे नंतर रायबाचे’ असे उद्गार काढून स्वतःच्या प्राणाची चिंता न करता युद्ध केले व महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचा इतिहास रचला, अश्या वीर योद्धाचा
वीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट म्हणजेच ‘तानाजी’ हा पूर्ण महाराष्ट्रातील सिनेमा गृहात टॅक्स फ्रि करावा तसेच राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हा सिनेमा मोफत दाखविण्यात यावा, करिता  आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाराष्ट्र सरकारला मागणी केली,
तानाजी मालुसरे याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे असे असून सुद्धा अद्याप हा चित्रपट राज्यातटॅक्स फ्री झाला नाही या सारखे दुर्दैव नाही, तसेच हाच चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केलेला आहे, मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे,
महाराष्ट्रात हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणे करून राज्यातील सर्व सामन्य जनतेला, युवकांना, हा सिनेमा अत्यल्प दरात बघायला मिळावा असे प्रतिपादन बादल कुळकर्णी व उपस्थितांनी केले..
यावेळी नगरसेवक प्रणित सोनी, भाजयुमो उपाध्यक्ष आकाश वाघमारे,गणेश खोत, कुणाल टिकले, तुषार चौधरी,शुभम तिखिले,राहुल इंगळे,निखिल भटकर,श्याम साहू,अखिलेश किल्लेदार, रोहित काळे, अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।