रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत अकोला शहर वाहतूक शाखेची जनजागृती मोहीम

158
जाहिरात

आकोलाः प्रतिनीधी

शहर वाहतूक शाखा अकोला द्वारा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या अंतर्गत रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्या साठी वाहन चालकां मध्ये जागृती यावी म्हणून रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अकोला शहर वाहतुक शाखेच्या वतीने राबवण्यात येत आहे. सुरक्षित वाहने चालवा व आपला जीव वाचवा ह्या अभियाना अंतर्गत वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी एकीकडे धडक मोहीम व जनजागृती सुरू आहे

,हा सप्ताह दि.११ ते १७ जाने.पर्यत राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत आज दिनांक 15।1।20 रोजी अकोला शहरातील बस स्टँड, तसेच प्रमुख चौकात कॉर्नर मीटिंग आयोजित करून सुरक्षित रित्या वाहने चालवून आपण अपघात कमी करू शकतो त्या साठी कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच असुरक्षित वाहने चालविण्याचे दुष्परिणाम सांगणारे माहिती पत्रक वितरित करण्यात आले,

तसेच ऑटो व सायकल रिक्षा वर रिफ्लेक्टर लावण्यात आले, सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचाऱ्यांनी पार पाडली।

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।