जि. प. व. प्राथ. शाळा मनब्दा येथे गंध फुलांचा वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात

199
जाहिरात

अकोटः ता.प्रतिनिधी

तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत मनब्दा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंम्मेलन गंध फुलांचा 2020 कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन दीपप्रज्वलन करून जेष्ठ शल्य चिकित्सक तथा जलयोद्धा डॉ. अरूणदादा भागवत यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंजाबराव तायडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती तेल्हाराचे नवनिर्वाचित सदस्य विलासभाऊ पाथ्रीकर, कृ. उ. बा. समिती तेल्हाराचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर, गोपालभाऊ राऊत सरपंच मनब्दा, जानराव पाथ्रीकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती, विजय टोहरे अध्यक्ष शिक्षक पतसंस्था अकोला, दिपक साबळे केंद्रप्रमुख पाथर्डी कन्या, किशोर कोल्हे केंद्रप्रमुख अडगाव बु, पांडुरंग चिमनकर, प्रमोदभाऊ चांदूरकर, पंचगव्हाण उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष मतीन शेख, विजय टावरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विश्वासराव पाथ्रीकर, माधव पाथ्रीकर, गोविंदराव वानरे, नितेश पोहरकार, कुसुमताई पाथ्रीकर, मीनाताई वानखडे, प्रविणभाऊ डोंगरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेला रोख किंवा वस्तुरूपाने देणगी देणाऱ्या देणगीदारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार संचालन स. अ. कु. अपर्णा इंगळे व प्रविण डेरे यांनी, प्रास्तविक मुअ राजेश चित्ते यांनी तर आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक श्री नितीन धोरण यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटीका, एकांकिका, मुकनाट्य, समुह नृत्य उत्कृष्ट पणे सादर केले. व गावकऱ्यांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी बक्षिसांची अक्षरशः लयलुट केली. याप्रसंगी मनब्दा व निंबोळी येथिल पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभारी मु. अ. राजेश चित्ते, पशि नितीन धोरण, श्याम पाठक, प्रविण डेरे, कु. सुनिता चव्हाण, कु. अपर्णा इंगळे, दिपक पाथ्रीकर, महानंदा पाथ्रीकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।