खबरदार…! माहिती अधिकारात माहिती मागितली तर डायरेक्ट पालकमंत्र्यांच्या नावाने धमकी…

1134
जाहिरात

बीड (प्रतिनिधी) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करणे या योजनेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज बाळगून माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बीड यांना माहिती मागितली असता बारगजे नावाचे कर्मचारी यांच्याशी भेटा असे सांगितले संबंधित टेबल हा सन्माननीय बारगजे साहेब यांच्याकडे येतो त्यांच्याकडे माहिती द्यावी अशी विनंती केली असता “तू मला वैयक्तिक खेटत आहेस तू मला ओळखलं नाहीस या प्रकरणांमध्ये तू पडू नको तुला काय पाहिजे आहे ते सांग मी साधासुधा कर्मचारी नाही माझ्या बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपासून ते ग्रामपंचायत सदस्य पर्यंत ओळखी आहेत असे धमकावत दबाव टाकून माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.” या योजनेअंतर्गत जिल्ह्यातून असंख्य स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज दाखल केलेले असून अर्ज जास्त आल्याचे सांगून बोगस लकी ड्रॉ पद्धत राबवली व आपापल्या सान्निध्यात असणाऱ्या लाभार्थ्यांकडून 40 ते 50 हजार रुपये पर हेड घेऊन मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवून दिला आहे मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी असणाऱ्या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळू दिला नाही. स्वयंसहाय्यता बचत गट संबंधित कार्यालयातील नोंदणीकृत बचत गट असावे परंतु तसे झाले नाही लाभ मिळालेल्या लाभार्थ्याने मिनी ट्रॅक्टर विकले असून काही जणांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गहाणखत करून ट्रॅक्टर दिलेले आहेत त्यावर खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे कसल्याही प्रकारची उपाययोजना नाही तसेच संगनमताने केलेले घोटाळे बाहेर येऊ नये म्हणून 2016-2017-2018 ची यादी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदरील प्रकरणी अजय सरवदे सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी बीड यांनी आयुक्त,समाजकल्याण आयुक्तालय पुणे व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण औरंगाबाद यांना तक्रार केली असून मिनी ट्रॅक्टर घोटाळा प्रकरणाची चौकशी करून माहिती उपलब्द करून द्यावी अशी विनंतीही केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।