वेदांचं पुजन हे श्रेष्ठ भक्ती मार्ग – श्री स्वामी गोविंददेव गीरी महाराज

178
जाहिरात

श्रींचा प्रगटदिन महोत्सवानिमित्य कथा सत्संग

आकोटः संतोष विणके

वेदांचा अभ्यास वेद पुजन हा श्रेष्ठ भक्ती मार्ग आहे.गीता कृष्ण भगवानाने अर्जुनास सांगीतली.व महर्षी व्यास यांनी ती सर्वासाठी उपलब्ध करुन दिली.भारतीय संस्कृतीत महर्षी व्यासांचे स्थान सर्वोच्च आहे असे विचार तपोनिष्ठ श्री स्वामी गोविंददेव गीरी महाराज यांनी केले.ते संत गजानन महाराज विहीर शांतीवन अमृततिर्थ येथे प्रगटदिन महोत्सवात आयोजीत कथा सत्संगाचे दुसरे पुष्प गुंफतांना बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले वेद हे ज्ञानाचं अथांग सागर आहे.गीतेतुन मानवकल्याणाचे ज्ञान आहे.त्यामुळंच ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचं अध्ययन केलं ज्ञानेश्वरी लीहली.वेदांच सार करणं म्हणजे मानव धर्म असे विचार स्वामीजींनी यावेळी व्यक्त केले.दरम्यान कथास्थळी गोविंददेव गीरीजी महाराज यांचे दर्शन तथा भागवत कथा श्रवणास खामगाव येथील वेद शाळेचे अभ्यासार्थी आले होते.कथेच्या दुसऱ्या दिवशीच्या पुष्पाचा समारोप हा कथेचे मुख्य यजमान कैलासचंद्र अग्रवाल व सौ.कुमुदीनी अग्रवाल यांच्या हस्ते भागवत आरती व संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यात आला.

यावेळी संस्थानच्या वतीने गजानन धर्मे यांनी शांतीवन अमृततिर्थ येथे वेद शाळेच्या स्थापनेचा मनोदय व्यक्त केला.या वेद शाळेला स्वामी गोविंददेव गीरीजी महाराजांनी मार्गदर्शन करत वेदशास्त्र संपन्न पिढी घडवावी अशी त्यांनी विनंती केली.दुसऱ्या पुष्पाचं प्रास्ताविक हभप विठ्ठल महाराज साबळे यांनी केले.कथे नंतर दैनंदिन हरीपाठ व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।