आजारी पत्रकार सुरज पाटील यांना नरखेड तालुका पत्रकार संघातर्फे ५२ हजार रुपयांची मदत !

253
जाहिरात

नरखेड तालुक्यातील पत्रकारसोबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लावला मदतीचा हातभार !

 

 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या तरुण पत्रकार सुरज मोतीरामजी पाटील मु.-विहिरगाव ता.-उमरेड यांना अवघ्या ३५ व्या वर्षी किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांच्यावर शंकरनगर,नागपूर चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना थोडी फार चिमुकली आर्थिक मदत व्हावी यासाठी नरखेड तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला होता. या उपक्रमाअंतर्गत नरखेड तालुक्यातील पत्रकारांनी व काही समाजसेवकांनी आपल्या-आपल्या परिने मदत दिली व गोळा झालेली ५२ हजार रुपयांची मदत आज ( ता. १० ) सुरज व त्यांची पत्नी सौ. एकता यांच्याकडे सोपविण्यात आली.

आपल्या बातम्यातून तसेच सामाजिक कार्यातून अनेकांना न्याय मिळवून देऊन अनेकांच्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या सुरज पाटील या ३५ वर्षीय तरुण पत्रकाराला मागील काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने आपल्या विळख्यात घेतले व त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु झाला. परंतु त्यांना डायलिसीसची गरज पडत असल्यामुळे व याचा खर्च खूप असून सुरज ची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे नागपूर जिल्हा पत्रकार संघ तर्फे मदतीचे आव्हान करण्यात आले होते. याची दाखल नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिक वैद्य व सरचिटणीस योगेश गिरडकर यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून तालुक्यातील परकर व समाजसेवक यांनी मदतीचे आव्हान केले होते. त्यांच्या या मदतीच्या आव्हानाला नरखेड व काटोल तालुका पत्रकार संघ, नागरिक तसेच मित्र मंडळींनी साथ देऊन खारीचा वाटा उचलला आहे  व या उपक्रमातून काहीच दिवसात ५२,०००/- रुपये जमा झाले. ही रक्कम सौ.एकता सुरज पाटील व त्यांचे पती पत्रकार सुरज मोतीरामजी पाटील यांच्याकडे एशियन हॉस्पिटल शंकरनगर,नागपूर येथे सोपविण्यात आली आहे. यावेळी नरखेड तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस योगेश गिरडकर, मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष, योगेश कोरडे, सावरगावचे हंसराज गिरडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा.राजकुमार मिश्रा, सुरज बालपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. यापुढेही जेव्हा-जेव्हा गरजू गरीब लोकांना मदतीची गरज राहील तेव्हा-तेव्हा मदत करण्याचे आव्हान करून तसे आश्वासन तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले आहे.

फोटोओळी- आजारी पत्रकार सुरज पाटील व त्यांच्या पत्नी सौ. एकता यांनी मदतीची रक्कम देतांनी नरखेड तालुक्याचे पदाधिकारी व मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष, योगेश कोरडे व इतर मान्यवर

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।