चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीच्या विजयाचा जल्लोष – फटाक्यांची आतिषबाजी

339
जाहिरात

चांदूर रेल्वे –

दिल्लीच्या जनेतेनं आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला असून दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांचं सरकार आल्याने अमरावती चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीचाया कार्यकर्त्यांनी नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात विजयात सहभागी होत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर २०१२ साली सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात उडी घेत आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. दोन टर्ममध्ये विजयी झाल्यानंतर तिसऱ्या टर्ममध्येही मंगळवारी विजय संपादित केला. मोफत विज, पाणी, शाळांचा दर्जा सुधरविला, मोहल्ला क्लिनीक व आरोग्य व्यवस्था चांगल्याप्रकारे केली अशा ठोस कामामुळे पुन्हा एकदा दिल्ली राखली. याचा जल्लोष चांदूर रेल्वे शहरातील तहसील कार्यालयासमोर करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच यावेळी घोषणाही देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी स्वत:च्या डोक्यावर आम आदमी पार्टी लिहलेली गांधी टोपी घालून सर्वांचे लक्ष वेधले होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।