श्रींच्या दर्शनार्थ शांतीवन अमृततीर्थावर लाखो भक्तांची मांदियाळी

171
जाहिरात

संस्थान चा प्रगट दिन उत्सव झाला लोकोत्सव

श्री भक्तां करता मोफत प्रवास सेवा

मुस्लिम बांधवांनी केली श्री भक्तांची सेवा

आकोटःसंतोष विणके

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे योगीराज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव संत गजानन महाराज संस्थान विहीर शांतीवन अमृत तीर्थ येथे लाखो भक्तांच्या मांदियाळीत उत्साहात साजरा झाला. श्रींच्या प्रगटदिन महोत्सवानिमित्त शांतीवन अमृत तीर्थावर गेल्या आठ दिवसापासून धार्मिक-अध्यात्मिक अनुष्ठानांसह विविध कार्यक्रम पार पडले.

प्रगटदिन महोत्सवानिमित्त संस्थांनच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टचे सदस्य आंतरराष्ट्रीय कथा प्रवचनकार स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांची भागवत कथा पार पडली. तसेच विजय ग्रंथ पारायण हरिपाठ हरिकीर्तन रक्तदान शिबिर ,56 भोग प्रसाद व दैनंदिन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रींच्या प्रगट दिनानिमित्त श्रींच्या मूर्तीचा मंत्रपठणात महाअभिषेक व पूर्णाहुती महायज्ञ पार पडला. त्यानंतर महाआरती होऊन टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी पालखी च्या गजरात श्रींच्या मुखवट्याची नगरप्रदक्षिणा झाली. त्यानंतर मुख्य सभामंडपात हजारो भक्तांच्या उपस्थितीत ह भ प विठ्ठल महाराज साबळे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा सुरुवात झाली.

श्रींच्या दर्शनार्थ यावेळी विविध गावांतून पालख्या व दिंड्या आल्या होत्या तर रात्रभरा पासून पैदल वारी करणाऱ्या श्री भक्तांची विहीर मार्गावर वर्दळ होती. श्रींच्या दर्शनाला येणार्‍या भाविक भक्तांसाठी मार्गावर ठिकठिकाणी चहा-पाणी फराळ फळ व प्रसादाचे मोफत वितरण करण्यात येत होते.

श्रींच्या प्रकट दिन महोत्सवासाठी शांतीवन अमृत तीर्थ वर दरवर्षीपेक्षा यंदा जास्त भाविकांची गर्दी उसळली होती. सूत्रांच्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले होते तर श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान प्रकट दिन महोत्सवासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

संस्थान परिसरासह यात्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

संस्थानचा प्रगट दिन उत्सव झाला लोकोत्सव

संत गजानन महाराजांच्या लाखो भक्तांच्या गर्दीने शांतीवन अमृत तीर्थ परिसर गजबजून गेला होता. दरवर्षीपेक्षा श्रींच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा वाढली असून वाहनांच्या पार्किंग ची रांग ही सुमारे एक किलोमीटर पर्यंत लांब लागली होती तर भक्तांच्या सोयीसाठी संस्थानद्वारा अविरत महाप्रसादाचे वितरण सुरू होते दुपारी तीन वाजेपर्यंत भक्तां करीता 61 क्विं पोळ्या 50 क्विंटल बुंदी 25 क्विंटल भाजी व 15 क्विंटल भाताचे वितरण करण्यात आले होते तर सुमारे ५० हजारच्यावर भक्तांनी या महाप्रसाद सुविधेचा लाभ घेतला.

मुस्लिम बांधवांनी केली श्री भक्तांची सेवा

प्रगटदिन महोत्सवानिमित्त शांतीवन अमृत तीर्थ वर जाणार्‍या भाविकांना मोहोळा फाट्यावर मुस्लिम बांधवांनी फराळ व पाणी वितरित केले. श्रींच्या उत्सवातील सामाजिक सलोख्याचे हे चित्र बघून श्री भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत होते.भाविकांनी मुस्लिम बांधवांच्या या ऐक्‍याचं भरभरून कौतुक केले.

चालक-मालक संघटनेची मोफत प्रवाससेवा

अकोट शहरातून विहिरीवर श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना करता शहरातील अग्रसेन चौक येथून भक्तांसाठी मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. श्री भक्तांच्या सेवेसाठी संघटनेची सुमारे 300 च्या वर वाहने ही श्री भक्तांसाठी मोफत फेऱ्या मारत होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।