मृत बालकाच्या त्या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल 5 महिन्यांपूर्वी आढळले होते विहिरीत बाळ

जाहिरात

मृत बालकाच्या त्या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

5 महिन्यांपूर्वी आढळले होते विहिरीत बाळ

चांदुर बाजार :-

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या करजगाव येथील बालाजी संस्थेच्या परिसरातील कोरड्या विहीर मध्ये 9 सप्टेंबर 2019 ला एका जिवंत 6 महिन्याचा मुलीला फेकले असल्याची घटना घडली होती.त्या ठिकाणी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता मात्र चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची भीती होती.शिरजगाव कसबा पोलिसांनी घटनास्थळी गाठून तत्कालीन ठाणेदार अशोक कांबळे यांनि दिला बाहेर काढले.मात्र अधिक जास्त मार लागले असल्याने उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी मर्ग दाखल करणयात आला होता.

ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी शवविच्छेदन अहवाल वरून असे लक्षात आले की स्त्री जातीच्या या लहान बाळांला जिवंत मारण्याच्या उद्देश घेऊन विहिरीत फेकण्यात आले होते.या आधारावर त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 21 फ्रेबुवारी ला अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली.सदर प्रकरणाचा तपास अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन ,अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शिरजगाव कसबा गोपाल उपाध्यय आणि त्यांची टीम करीत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।