अमरावती जिल्हात महावितरण अधिकारी आणि ठेकेदार मालामाल ,शेतकरी मात्र आर्थिक संकटात अधिकारी आणि ठेकेदार यांची झाली पाहिजे चौकशी जनसामान्य ची मागणी,माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर

1077
जाहिरात

अमरावती जिल्हात महावितरण अधिकारी आणि ठेकेदार मालामाल ,शेतकरी मात्र आर्थिक संकटात
अधिकारी आणि ठेकेदार यांची झाली पाहिजे चौकशी जनसामान्य ची मागणी,माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर

अमरावती :-

महावितरण कडून शेती पंपाचे बिल वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे.यामध्ये शेतकरी भरडला जाणार हे नक्की .मात्र याच सर्व गोष्टींचा फायदा हा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी,वरुड चांदुर बाजार तालुक्यातील महावितरण अधिकारी आणि खाजगी ठेकेदार याना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मीटर रीडिंग घेतल्यावर बिल तयार केली जातात मात्र चांदुर बाजार तालुक्यातील शेती पंप चा रीडिंग कधीच घेतले गेले नाही.अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांच्या कडे सुद्दा माहिती उपलब्ध नाही. ज्या संबंधित ठेकेदार यांनी या कृषी पंप रीडिंग आणि बिल वाटप चा ठेका घेतला त्यांना रीडिंग कसे घेण्यात आले हे विचारायला अधिकारी यांना वेळ नाही फक्त आपले कमिशन वेळेवर मिळावे हेच त्यांची ईच्छा दिसत असली तरी या सर्व बाबी कडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज असते मात्र त्यांना सुद्धा या गोष्टीचे ज्ञान नसल्याचे दिसत आहे.याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी याना बसत आहे.मात्र महावितरण अधिकारी आणि ठेकेदार याच्या कार्यवाही कोण करणार?कारण रीडिंग पद्धत ही संपूर्ण पणे ऑनलाइन झाली असल्याने ज्या ग्राहकाचे रीडिंग घ्यायचे आहे मीटर रीडिंग घेणारे याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन रीडिंग च्या अँप मधून रीडिंग घ्यावे लागते.या वेळी अक्षांश आणि रेक्षांश त्या ठिकाणच्या मोबाईल मध्ये सेव होते.मात्र या सर्व बाबी कडे दुर्लक्ष करीत ठेकेदार एखाद्या विशिष्ट जागेवरून ही रीडिंग घेत आहे. हे जरी एकच येत असले तरी याची माहिती अधिकारी यांना असून देखील ते आपल्या कमिशन मुळे गप्प आहे.तर यावर वरिष्ठ अधिकारी यांना हा प्रकार सुरू असून देखील ते पण या कडे दुर्लक्ष करीत असलेच चांदूर बाजार,मोर्शी,वरुड तालुक्यात दिसत आहे.या सर्व मुले शेतकरी मात्र आर्थिक संकटात अडकला असून या सर्वांवर आवाज उठवणारे पुढारी देखील शांत आहे.

मागील 1 ते 2 वर्षा पासून हा सर्व प्रकार चांदुर बाजार तालुक्यात सुरू असून यावर चांदुर बाजार चे उपविभागीय अधिकारी हे मौन धरून आहे.यामुळे अनेक ठेकेदार हे मालामाल होत आहे. शेतकरी हे मात्र आर्थिक संकटाशी दोन हात करीत आहे.त्याच प्रमाणे या वर्षी पाण्याची पातळी अधिक खोल गेल्याने शेतकरी यांनी नव्याने बोरवेल खोदले मात्र या ठिकाणी कृषी पंप वीज जोडणी बंद असताना सुद्धा अनेक शेतकरी याना वीज जोडणीच्या नावावर हजारो रुपये या खाजगी ठेकेदार यांनी लाटले आहे. ज्या शेतकरी याना अश्या प्रकारचे वीज जोडणी करून दिली आहे.ही वीज जोडणी कोणत्याही प्रकारची माहिती न घेता देण्यात आल्याने हिचे रेकॉर्ड तयार नाही. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचे समजते आहे. त्या शेतकरी याचा काय दोष त्यांनी तर संबंधित ठेकेदार याला पैसे दिले.पण आता पुन्हा शेतकरी हा अडचणीत येणार असल्याचे चित्र चांदुर बाजार ,मोर्शी,वरुड तालुक्यात महावितरण च्या अधिकारी आणि ठेकेदार याच्या केवळ आर्थिक लाभामुळे दिसत आहे.तर यांची चौकशी होऊन उचित कार्यवाही होणे असल्याची जनसामान्य आणि शेतकरी वर्ग कडून होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।