अवैध गुटखा तस्करीवर अन्न व प्रशासन विभागाची कार्यवाही का नाही? एक दोन कार्यवाही वर प्रशासन समाधानी  ग्रामीण पोलीस विभागाच्या धडाडीच्या कार्यवाही जनसामान्यांमध्ये चर्चेला उधाण

177
जाहिरात

अवैध गुटखा तस्करीवर अन्न व प्रशासन विभागाची कार्यवाही का नाही? एक दोन कार्यवाही वर प्रशासन समाधानी

ग्रामीण पोलीस विभागाच्या धडाडीच्या कार्यवाही जनसामान्यांमध्ये चर्चेला उधाण

अमरावती:-

अमरावती जिल्ह्यातील पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात गुटखा बंदीसाठी कठोर पावले उचलली असताना अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी अवैधपणे होत असलेल्या गुटखा विक्री आणि गुप्ता साठवणूक करणार्‍यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. मात्र पोलिसाना अनेक प्रकरणात तपास करत असताना देखील गुटका तस्करीवर कार्यवाही करणे सोयीस्कर होत आहे. तर अन्न व प्रशासन विभाग यांना या व्यवसायाबद्दल कार्यवाही किंवा माहिती का नाही अशी चर्चा अमरावती जिल्ह्यात अमरावती ग्रामीण पोलिस त्यांच्या कार्यामुळे सुरू आहे .

स्थानिक पातळीवर काम करणारे पोलिस विभाग यांना अनेक प्रकारचे गुन्हे तपास तसेच तक्रार व चौकशी आणि तपास करावा लागतो .तर गुटखा दारु यासारख्या अवैध व्यवसाय वर कारवाई करण्यासाठी अन्न व प्रशासन विभाग कार्यरत असतांना देखील अमरावती जिल्ह्यात फक्त प्रशासन विभाग कागदपत्र असल्याचे दिसत आहे .त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे जनसामान्यांमध्ये चर्चेला उधान आले ,असून केवळ अन्न व औषध प्रशासन विभाग फक्त नावालाच तर नाही अशी चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.

तर पोलिस विभागाच्या कारवाईमुळे ग्रामीण भागातील गुटखा विक्री करणारे यांच्यावर कारवाई सुरू आहे याचा परिणाम जिल्ह्यातील गुटखाबंदी व निर्बंध आणण्यासाठी पोलीस सतर्क असून अन्न व प्रशासन विभाग यादी सुद्धा स्वतः करून कार्यवाही करणे आवश्यक आहे तेव्हा अमरावती जिल्ह्यातील गुटखा बंदीला पायबंध लागेल अशी चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।