गुरुमाऊलींच्या दर्शनार्थ लोटला जनसागर

134
जाहिरात

आकोटःसंतोष विणके

गुरुमाऊलींचा जन्मोत्सव सोहळा,याचि देही याचि डोळा…
———————-
माऊलींच्या रिंगण सोहळ्यात भक्तीरंगाची उधळण  

श्रद्धेय  श्री संत वासुदेव महाराज यांचा जन्मोत्सव भक्तीभावपूर्ण संपन्न झाला.राज्यभरातून आलेल्या वासुदेव भक्तांच्या उपस्थितीने आकोट संतनगरीला अवघी अवतरली पंढरी दुमदुमून गेलाचे दृष्य दिसून आले.५० हजारावर भाविकांनी मनोभावे दर्शन घेवून धन्य झाले.

गुरुमाऊलींचा जयंती महोत्सव १९फेबुवारी पासून श्रद्धासागर येथे प्रारंभ झाला.या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती जन्मोत्सव सोहळ्याने झाली. जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ‘श्रीं’ च्या महाभिषेकाने झाला.संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते सपत्नीक अभिषेक पार पडला यवेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर.सचिव रविंद्र वानखडे ,सहसचिव मोहन पु.जायले,अवि गावंडे,विश्वस्त डाॕ अशोकराव बिहाडे,सदाशिवराव पोटे,प्राचार्कय गजानन चोपडे,मलताई गावंडे,अशोकराव पाचडे,सुनंदा आमले,जयदिप सोनखासकर,दिलिप हरणे,अनिल कोरपे,केशवप्रसाद राठी,गजानन दुधाट,आदी हजर होते.

गुरुमाऊली जन्मोत्सवानिमित्त आयोजित गुरुमाऊली’ पालखी सोहळ्यात गावोगांवच्या वारकरी दिंड्या व हजारो भाविक सहभागी झाल्या होते.दरम्यान गुरुवर्यांचे निवासस्थानी माधवराव मोहोकार ,पुरुषोत्तम मोहोकार यांनी पालखी रथाचे पुजन करुन महाआरती केला. यावेळी वासुदेव नगर रांगोळ्या,पताकांनी सुशोभित करण्यात आले होते.टाळ मृदंगाचे स्वरात नाचत गात अभंगाचे गायनाने संतनगरी दुमदुमून गेली.ॐवासुदेव नमो नमः,पुंडलिका वरदे…, ज्ञानबा तुकारामाचे गजरात पावल्या फुगड्या खेळत भक्तगण भक्तीरंगात न्हाऊन गेले होते.दिंडी मार्गावर दुतर्फा उभे राहून शहरवासियांनी गुरुमाऊलींचे मनोभावे दर्शन घेतले..तर ठिकठिकाणी स्वयंसेवी व सामाजिक संस्था व युवक मंडळांनी पिण्याचे पाणी,शरबत,चहा,फराळाची उत्तम व्यवस्था केली व पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले.

गुरुमाऊली पालखी सोहळ्यात उत्कृष्ट सहभाग घेतल्याबद्दल गुरुवर्य वासुदेव महाराज उत्कृष्ठ दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रथम,द्वितीय आणि तृतिय क्रमांकाच्या पुरस्काराचे अनुक्रमे विठ्ठल रुख्ख्मिनी मंडळ रोहनखेड,गुरुमाऊली’ महिला मंडळ घुसर आणि गुरुमाऊली भजनी मंडळ दिवठाणा मानकरी ठरले.देवूळगांव व सावरगांव येथील भजनी दिंडीला प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले.दिंडी प्रमुखांनी हा सन्मान स्विकारला.

माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा

पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराजाचे आळंदी- पंढरपूर दिंडीतील कर्नाटक अंकली येथील श्रीमंत शितोडे सरकार यांचे अभूतपूर्व रिंगण सोहळाने याचि देही यांची डोळा 

म्हणून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेला.या अश्वांनी दिंडी मार्गात दोन ठिकाणी उभे रिंगण व श्रद्धासागर येथे गोल रिंगण पार पडले. अश्वांनी धाव घेत घेत भक्तीरंगाची यथेच्छ उधळण केली.उपस्थितांनीही ज्ञानबा तुकाराम गजर करीत उत्स्फूर्त साद देली.अविस्मरणीय म्हणून हा रिंगण सोहळा अनेकदिवस स्मरणात राहील.संस्थेचे विश्वस्त अनिल कोरपे,ह.भ.प. श्रीकांत खवले यांचे मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळ्यासाठी ३००स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ गुरुपुजनाने झाला.संतपीठावर ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कु-हाडे व संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी गुरुपुजन केले तर संस्थेच्या विश्वस्तांनी सपत्नीक गुरुवंदना केली.सौ सुमनताई पोटे यांनी रचित व प्रा.प्रतिभा पवित्रकार वाघ यांनी स्वरबद्ध केलेल्या गुरुवंदनेच्या सुमधूर स्वरांनी वातावरण भारावून गेले होते.
शिवसेनेचे दिलिप बोचे यांनी दरवर्षीप्रमाणे शिर्डी येथून आणलेला भलामोठा गुलाबपुष्पांचा हार गुरुमाऊलींना अर्पण केला.

दरम्यान वै.वंदनाताई जगदेवराव लाजुरकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धासागर अंतर्गत मार्गाचे डांबरीकरण व पेव्हर्स ब्लाॕक कामाचे शिलालेखाचे अनावरण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कु-हाडे यांचे हस्ते पार पडले.पुरुषोत्तम लाजुरकर व परिवारांने या कामासाठी भरीव योगदान दिले.संस्थेच्या नियोजित आळंदी धर्मशाळेच्या जागा खरेदी व बांधकामासाठी देणगी देणा-या देणगीदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.जयंत्ती महोत्सवात निष्काम सेवा प्रदान करणा-या सेवागट व सेवेक-याचाही सत्कार पार पडला.हरिओम वासुदेव सेवा समितीचे अध्यक्ष बाबाभाई सेजपाल व दिलिप चावडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
————————-
श्रद्धासागरातील संस्कार मोती वेचत धन्य व्हा! – कु-हाडे महाराज

गुरुवर्य वासुदेव महाराज जयंती महोत्सवाने नवी उर्जा मिळते. श्रद्धासागरातील श्रद्धा,भक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम अलौकिक आहे.ही पुण्यभूमी आहे.येथील मातीच्या कणा कणात चैतन्य वास करते.श्रद्धासागरातील संस्काराचे मोती वेचत धन्य व्हा असा संदेश ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कु-हाडे यांनी यावेळी दिला.


कार्यक्रमाचे संचालन विश्वस्त जयदिप सोनखासकर,नंदकिशोर हिंगणकर यांनी तर आभार संस्थेचे सचिव रविंद्र वानखडे यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।