*शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार ! शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार आक्रमक* 

1020
जाहिरात

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी वरुड तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असून पाण्याची पातळी १००० ते १५०० फूट खोलीवर गेली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे , पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची चांगलीच कमतरता भासत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता  कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभेमध्ये केली आहे.

शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले असून वाघ,बिबट्या,रानडुकरे आदी जंगली प्राणी व तत्सम संकटामुळे हैराण झाला असून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना आपला रब्बी हंगाम वाचविण्यासाठी दिवसा विज पुरवठा करावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला आहे.

यंदा राज्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने विहिरींची भूजल वाढण्याबरोबरच धरणेही काही प्रमाणात भरल्याने शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे. शेतकऱ्यांची रब्बी पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.आता संत्रा , मोसंबी , गहू,हरभरा, आदी  पिके तर भाजीपाला आदी पिके  अंतिम टप्प्यात आली असल्याने या उभारलेल्या पिकांना पाणी देण्यास प्रारंभ झाला आहे.मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीने आपल्या लीला दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दिवसा कायमच वीज गायब असते तर रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास महावितरण कंपनीने प्रारंभ केला आहे.सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे.त्यातच बिबटे,वाघ व रानडुकरे या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी भरण्यास जाणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे.या बाबत महावितरण कंपनीस कल्पना देऊनही शेतकऱ्यांचा कैवार कोणीही घेताना दिसत नाही हि दुर्भाग्याची गोष्ट असून महावितरण कंपनीने दिवस भारनियमन करून वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आक्रमक भूमिका  आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभेमध्ये मांडली .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।