महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमा बंद पोलिसांचा वाढला आपला पहारा शिरजगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा थडी पोलीस सतर्क

जाहिरात

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमा बंद पोलिसांचा वाढला
आपला पहारा
शिरजगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा थडी पोलीस सतर्क

चांदुर बाजार:-

कोरोना मुळे अनेक कंपनी या बंद पडला त्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे लोक हे परत येत असून यामध्ये मध्यप्रदेश मधील अधिक जास्त प्रमाणात युवक आहे.काल दिनांक 23 मार्च महाराष्ट्र च्या सीमेवर असलेल्या दाभोना या मध्यप्रदेश मधील गावा मध्ये काही युवक हे दिल्ली वरून आले असून त्यामध्ये 3 जण संशयित असल्याची चर्चा गावात सुरू झाली होती.महाराष्ट्रचे मुख्यमंत्री याच्या आदेशाने संचारबंदी नंतर मध्येप्रदेश ला जोडणारा सर्व रस्ता पोलिसांनी बंद केलं आहे.

ब्राम्हनवाडा थडी या ठिकाणी चिंचोली वरून दाभोना जाणार रोड देखील बंद करणयात आला आहे तर शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील पाळा या रोड द्वारे होणारी वाहतूक देखील शिरजगाव कसबा पोलीस यांनी बंद केली आहे.तसेच काम असेल तर बाहेर पाडा असे आवाहन पोलीस विभाग यांनी जनतेला केले आहे.

बहिरम येथे शिरजगाव कसबा चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी पोलिसाचा बंदोबस्त वाढविला असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र मधून होणाऱ्या वाहतूक वर निर्बंध लावण्यात आले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।