Home Blog

*मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर*

 

*पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत*

मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
000

लेट. बी. एस. देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली अभ्यासाकीय भेट…

लेट. बी. एस. देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली अभ्यासाकीय भेट…

शेगाव येथील स्व.भाऊराव शिवरावजी देशमुख बहुउद्देशीय संस्था शेगाव द्वारा संचालित लेट. बी. एस. देशमुख इंग्लिश स्कूल यांनी शेगावची मार्केट व्हिजीट म्हणून बँकेला जाऊन भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा तसेच देवाण-घेवानाचा व्यवहाराचा हेतू लक्षात घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात याबद्दल संपूर्ण माहिती असावी कारण हाच विद्यार्थी उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक असणार आहे. त्या अनुषंगाने हे विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे नसावा हा हेतू लक्षात घेत आज इयत्ता ०३ ते इयत्ता ०६ च्या सर्व विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची संपूर्ण ज्ञान व्हावे बँकेतील विल्स अँड एज्युकेशन काय आहे बँक म्हणजे काय? बँक मध्ये कसल्या प्रकारचे देवाण-घेवाण होते? बँक मध्ये पैसे ठेवण्याची पद्धत, व्याजदर कसे असतात सोबतच बँकेमध्ये अकाउंट म्हणजेच बचत खाते कसे उघडतात त्यामध्ये पैसे कैसे भरावेत आणि काढावे त्यासोबतच इतरही संबंधित स्लिप चा कसा वापर करावा लागतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ATM कार्ड याचा वापर कसा केला जातो व याची नियमावली काय या आहे अशा सर्व प्रश्नांचा उलगडा शाळेचे विद्यार्थ्यांनी तेथे केला सर्वप्रथम HDFC बँकेच्या व्यवस्थापकांनी या चिमुकल्यांचे स्वागत करून संपूर्ण माहिती दिली याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने जिज्ञाशाने वृत्तीने बँक कर्मचाऱ्यांशि अनेक विविध प्रश्नांवर चर्चा केली सोबतच हवी ती माहिती नोट करून घेतली. याप्रसंगी सर्व शालेय शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती व शिक्षकांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे आभार मानले. की त्यांनी आम्हा सर्वांना सहकार्य केले. या भेटीदरम्यान बँक व्यवस्थापकाने सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
शालेय शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्केटिंग ज्ञानामध्ये कशी भर होईल या उद्देशाने शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना HDFC बँक येथील कर्मचाऱ्यांची संवाद साधला. त्यांना केवळ पूर्ववृत्त ज्ञान नव्हे तर जीवनात आवश्यक त्या व्यवहारिक ज्ञानाचाही लाभ व्हायला पाहिजे या हेतूने ही भेट देण्यात आली.

शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी !

ग्रामीण पोलिसांनी १३ वर्षीय बालकाला पालकांच्या दिले ताब्यात*

शेगाव : ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि 18 वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकांच्या ताब्यात देऊन ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ यशस्वी केले आहे. बुलडाणा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांचे आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान-13 हि शोध मोहीम दिनांक ०१ डिसेंबर ते दिनांक ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणे करीता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमे अंतर्गत 18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पो. उपनि, गजानन शिंदे, व तीन पोलीस अंमलदार एक महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे. सादर पथक हे शोध मोहीम दरम्याण पेट्रॉलीग करीत असतांना, ग्राम जवळा बसस्थानक येथे प्रसाद शशिकांत सांळुखे वय १३ वर्ष रा. वालेकर हा रडत असतांना मिळून आला. त्यास विचारपुस केली असता त्याने सांगतले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंप्री चिंचवड येथील राहणार असून आपण रागाचे भरात पुणे येथुन लक्झरी बसमध्ये शेगांव व तेथून जवळा येथे ऑटोने आलो आहे असे सांगितले.पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडुन त्याचे कुटुंबाची माहिती घेतली. त्यांनतर ठाणेदार प्रविण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंखे रा. पुणे यांचा मोबाईल क्रं. प्राप्त करुन त्यावर संपर्क करुन मुला विषयी माहिती देण्यात आली. त्यांनतर पालक शेगावात पोहचल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हि कारवाई पो.अ.सा.विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव, विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

अमरावती ब्रेकिंग :- विद्यार्थिनीच विनयभंग प्रकरणी संतप्त पालकांनी केली शिक्षकाची धुलाई ; फोर व्हीलर ची ही तोडफोड

अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या
शिंदी बु येथील एका खाजगी संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत शिक्षकाच्या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत शाळेच्या परिसरात ठेवलेल्या शिक्षकाच्या कारची तोडफोड केली.

 

घटनेची माहिती होताच पथ्रोट पोलिस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी एसआरपीएफ पथक व
अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी बोलावली. या दरम्यान पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या शिक्षकाने आपल्या बचावाकरिता स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी व नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त
नागरीक शिक्षकांप्रती रोष व्यक्त करत असतांना या शिक्षकास पोलिसांच्या सुरक्षतेत वाहनात बसून पथ्रोट येथे नेण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत

*शंकराचार्य जी ने काशी से किया प्रस्थान,चार धाम शीतकालीन यात्रा में होंगे सम्मलित*

 

वाराणसी,2.12.24 परमधर्माधीश ज्योतिष्पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री: अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती जी महाराज आज प्रातः 10 बजे काशी से अगले गंतव्य की ओर पधार गए हैं।शंकराचार्य जी महाराज के प्रस्थान के समय भारी संख्या में सन्तों व भक्तों की भीड़ एकत्र हो गई थी।शंकराचार्य जी महाराज केदारघाट के बगल में स्थित श्रीविद्यामठ के नीचे गंगातट पर हो रहे पार्थिव शिवलिंग पूजन में सम्मलित होकर जल मार्ग से अस्सी गए जहां से सड़क मार्ग द्वारा बाबतपुर पहुंचे वहां से वायुमार्ग द्वारा शाकंभरी देवी शंकराचार्य आश्रम सहारनपुर हेतु प्रस्थान कर गए।

उक्त जानकारी देते हुए शंकराचार्य जी महाराज के मीडिया प्रभारी संजय पाण्डेय ने बताया कि परमधर्माधीश शंकराचार्य जी महाराज आज से 15 दिसम्बर तक कुछ राज्यों के विभिन्न नगरों में आयोजित मांगलिक व धार्मिक अनुष्ठान में भाग लेंगे।जिसके उपरांत शंकराचार्य जी महाराज 16 दिसम्बर से उत्तराखंड में शुरू हो रही शीतकालीन चारधाम यात्रा में सम्मलित होंगे।यात्रा आगामी पौष कृष्ण प्रतिप्रदा से सप्तमी तक तदअनुसार यात्रा 16 दिसम्बर से 22 दिसम्बर तक चलेगी।

ज्ञातव्य हो कि शीतकाल में भगवान की पूजा बन्द नही होती,केवल दर्शन-पूजन का स्थान परिवर्तित होता है। शीतकालीन चारधाम यात्रा से ग्रीष्कालीन यात्रा जितना ही फल प्राप्त होता है।यही जानकारी सनातनधर्मियों तक पहुचाने हेतु परमधर्माधीश शंकराचार्य जी महाराज ने यह शीतकालीन यात्रा पिछले वर्ष से प्रारम्भ की है।शंकराचार्य जी महाराज के प्रस्थान के समय उपस्थित भक्तों के नयन सजल हो गए थे।

शंकराचार्य जी महाराज के प्रस्थान के समय सर्वश्री-साध्वी पूर्णाम्बा दीदी,साध्वी शारदाम्बा दीदी,ब्रम्हचारी परमात्मानंद,रमेश उपाध्याय,सदानंद तिवारी,सतीश अग्रहरी,शैलेन्द्र योगी,नरोत्तम पारिख,सुनील शुक्ला,सक्षम सिंह योगी,ब्रम्हचारी चितप्रकाश,ब्रम्हचारी केशवानंद,अमन जी सहित भारी संख्या में श्रद्धालु सम्मलित थे।

अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- समोरासमोर दोन कार चा अपघात तिघांचा मृत्यू ; तीन जण जखमी

दर्यापूर :-

दर्यापूर – अकोला रोडवर आज दुपारच्या सुमारास दोन चार चाकी मध्ये भिषण अपघात होऊन 3 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन भरधाव कार या समोरासमोर आल्या त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास दर्यापूर – अकोला रोडवर दोन भरधाव चार चाकी वाहन एकमेकांवर आदळले सदरचा अपघात हा ग्राम लासूरच्या डोंगराजवळच्या मध्यभागी झाला या अपघातात विनीत गजाजनराव बिजवे प्रतीक माधवराव बोचे असे आधार कार्ड आढळून आले आहे. अपघात झालेल्या एका गाडी मध्ये चार जण प्रवास करीत होते तर दुसऱ्या एका गाडीत दोघे प्रवास करीत होते या पाच जणांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गोलू बाहेकर नामक व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी आंत असतांना वाटेतच त्याचा हि मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली.

या अपघातामध्ये एका कारमधील आनंद बाहकर (२६ वर्षे रा. सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ वर्षे रा. गजानन मंदिर साईनगर), प्रतीक बोचे (३५ वर्षे रा. सांग्लुडकर नगर) या तिघांचा मृत्यू झाला. तर कार मधील चौथा पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे चौघे कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते.घटनास्थळी येवदा पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर मृतकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

अमरावती ब्रेकिंग :- अज्ञात इसमाची निर्घृण हत्या ; डोक केलं धडावेगळ – डोक घटनास्थळावरून गायब

आज दुपारचा सुमारास आकोली पासून म्हाडा कॉलोनी जाणाऱ्या मार्गावर यादव वाडी जवळील खुल्या भुखंडावर डोक नसलेलं मृतदेह आढळून आला सदर घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले सदर घटनेची महिती मिळताच पोलीस चे सर्व अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले

अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- आयशर आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू

 

आयशर आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची घटना वरुड तालुक्यातील बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरावती रोडवरील लाखारा फाट्यानजीक रात्री ९ वाजताचे सुमारास घडली. या अपघातात अचलपूर येथील दोन तर पांढरघाटी येथील एकाचा मृत्यू झाल्याचे कळते आहे विदर्भ24न्यूज

प्राप्त माहीतीनुसार, रात्री ९ वाजताचे सुमारास एम.एच. ३७एक्स ३०७५ क्रमांकाचा आयशर ट्रक वरुड येथून अचलपूरकडे तर एम.एच.२७ बीएक्स ९१७१ क्रमांकाचा पिक अप वाहन मोर्शी कडून वरूडकडे जात असतांना बेनोडा (शहीद) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमरावती रोडवरील लाखारा फाट्यानजीक अचानक दोन्ही वाहन अनियंत्रीत व भरधाव वेगात एकमेकांसमोर धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनातील तीन मजुरांचा मृत्यू तर सहा गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झोले. यामध्ये राजेश रमेशराव युवनाते २० रा. पांढरघाटी ता. वरुड, तौफीक शहा फारूख शहा ३२ रा. रायपुरा अचलपुर आणि शेख नाजिम शेख साबीर ४० रा. बिलासपुरा अचल यांचा मृत्यू झाला. तर यातील मोहम्मद नासीर मोहम्मद साबीर ४५, मोहम्मदनिसार मोहम मतीन ३८, मोहम्मद कैसर मोहम्मद मतीन ४५ तिन्ही रा. अचलपुर यांना पुढील उपचारा नागपूर येथे रवाना करण्यात आले. तर मोहम्मद आबीद ४९, मोहम्मद मुजाहीद २५ अ मोहम्मद अरशद २८ सर्व रा. अचलपुर , यांचेवर वरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आता दुचाकीस्वाराबरोबर मागे बसणाऱ्याला ही हेल्मेट सक्ती ; आदेश जाहीर

अमरावती : विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व त्या मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी (Addl DGP Traffic Maharashtra) राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्याबाबतचे पत्र नुकतेच सर्वांना पाठविण्यात आले आहे. आता सहप्रवाशांवर स्वतंत्र हेड खाली कारवाई होणार असून त्यासाठी ई चालान (e-Challan) मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे.

अपर पोलीस महासंचालक यांनी सर्वांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मागील ५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच सेक्शन १२८ आणि १२९ मोटार वाहन कायदा १९८८ कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणार्‍या ई चालान मशीनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलीयन रायडर या दोन्ही केसेसची कारवाई या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती. विदर्भ24न्यूज

तरी ई चालान मशीनमध्ये सेक्शन १२९/१९४ (ड) एमव्ही ए शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून या पुढील कारवाई ही १) विना हेल्मेट रायडर २) विना हेल्मेट पिलीयन रायडर (सह प्रवासी) अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कडक व प्रभावीपणे करण्यात यावी. जेणेकरुन दुचाकीस्वार चालक व सह प्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असे या पत्रात म्हटले आहे.

*भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर :- डॉ अलिम पटेल.*

 

प्रतिनिधी: आज २६ नोव्हेंबर २०२४ भारतीय संविधान दिवस निमित्ताने डॉ. अलिम पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत इर्विन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाने आम्हा सर्वांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांची प्रगती झाली. आपल्या हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळाले. जनतेच्या मुलभूत अधिकारांवर जर गदा येत असेल तर आम्ही सर्व मिळून हक्कांसाठी लढत राहु असे यावेळी डॉ अलिम पटेल यांनी सांगितले. यावेळी मुख्य महासचिव मनिष साठे, प्रदेश प्रवक्ता किरण गुडधे, जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण, शहर अध्यक्ष विपुल चांदे, रविंद्र फुले, अन्सार बेग, अर्शद पठाण, डॉ बशिर पटेल, विजय सवई, लक्ष्मण चाफळकर, मुजफ्फर खान, आदी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.