Daily Archives: March 14, 2019

बाळापूर पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध धडक कारवाई

3 दिवसात 2 जुगार व 4 अवैध दारू विक्रीत्यांविरुद्ध कारवाईअकोला/ प्रतीनिधीआगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून बाळापूर पोलिसांनी अवैध धंद्या विरुद्ध धडक मोहीम...

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला, सहा जणांचा मृत्यू- अनेक जखमी

मुंबई : मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल अचानक कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीआहे. या...

अभियंता आणि ठेकेदार वर कार्यवाही करा.विकास सोनार याचे निवेदन

अभियंता आणि ठेकेदार वर कार्यवाही करा. विकास सोनार याचे निवेदन चांदुर बाजार:-///// चांदूरबाजार बांधकाम विभाग येथे कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता निलेश चौधरी आणि शिरजगाव कासबा तसेच माधान...

बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनपूर्णा मध्यम मधून...

बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदन पूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी. शशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी ब्राम्हणवाडा थडी महसूल क्षेत्र अंतर्गत...

एशियन आय हॉस्पीटलमध्ये विवाह दृष्टी भेट योजनेत 200 उपवर मुलींच्या डोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया

पुणे (प्रतिनिधी) : सध्याच्या जगात जाड भिंगाचा चष्मा असलेल्या मुलींची लग्न जमवताना प्रचंड अडथळे येतात. चष्मा असेलेल्या मुलींना नकार मिळतो यावर उपाय म्हणून पुण्यातीलजगप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी त्यांच्या एशियन आय हॉस्पीटल मध्ये विवाह दृष्टी भेट योजना  सुरु केलीय. लेसिक लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 200 उपवर मुलींच्याडोळ्यावर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली.   जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पुण्यातील युवक-युवतींनी चांगला प्रतिसाद दिला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटनकरण्यात आले. यावेळी नगर मधील साई सूर्य नेत्र सेवा चे संचालक प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सौ. सुधा कांकरिया, व एशियन आय हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. श्रुतिका कांकरियाउपस्थित होते. यावेळी बोलताना सौ. मुक्ता टिळक यांनी एशियन आय हॉस्पीटलच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या “लग्न जमवताना एखाद्या मुलीला दृष्टी दोष असेल तर अडथळेयेतात. त्यावर उपाय म्हणून या हॉस्पीटलमध्ये सुरु असलेली विवाह दृष्टी भेट योजना खूपच चांगली असून तब्बल ३२००० उपवर मुलींचा दृष्टी दोष काढून त्यांची लग्न जमली. ही खरोखरच कौतुकाचीबाब आहे. एक प्रकारचा हा एक वेगळा सामाजिक उपक्रम आहे.”  गेल्या २५ वर्षापासून कांकरिया परिवार पुणे आणि नगर तसेच राज्यातील नेत्र रुग्णांची अविरत नेत्र सेवा करीत आहे त्या बद्दल सौ.टिळक यांनी कांकरिया परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. वर्धमान यांनी या उपक्रमांची तसेच एशियन आय हॉस्पिटल उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. एशियन आय हॉस्पिटलने चष्माकाढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान व मशिनरी जर्मनीतून आणली आहे. त्याला लेसिक लेझर व्हिजन करेक्शन नेत्र शस्त्र क्रिया म्हणतात. सुरुवातीच्या नेत्र चाचण्या पूर्ण केल्यानंतरपाच  मिनिटातच दोन्ही डोळ्यावर लेझर शस्त्र क्रिया केली जाते आणि रुग्णाची दृष्टी लगेचच स्वच्छ होते. हि शस्त्र क्रिया संपूर्ण पणे सुरक्षित आणि वेदना विरहित आहे. डोळ्याच्या पडद्यालाकोणत्याही प्रकारचा छेद न देता, टाका न टाकता फक्त लेझर किरणाचा सफाईदार वापर करून रुग्णाचा दृष्टी दोष दूर केला जातो. एशिंयन आय हॉस्पिटल व साई सूर्य नेत्र सेवा गेल्या २५वर्षापासून ही शस्त्र क्रिया करीत असून हे तंत्र ज्ञान भारतात सर्वप्रथम आम्ही आणले याचा आम्हाला अभिमान आहे.  यावेळी डॉ. सौ. सुधा कांकरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी सूत्र संचालन करून शेवटी आभार मानले.

जेसीआय अकोट जेसीरेट विंग व्दारा महिला दिन साजरा

आकोट/ ता.प्रतीनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिवस जेसीआय च्या महिलांनी आस्की पब्लिक स्कुल मधील मुलींसोबत उत्साहात साजरा केला जेसीरेट महिला सदस्यांद्वारा यावेळी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी डॉ गुंजन...
- Advertisement -

Stay connected

28,562FansLike
0FollowersFollow
285FollowersFollow
0SubscribersSubscribe