दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्रकाराच्या गळ्यातील चेन हिसकावली

0
720
Google search engine
Google search engine

पुणे-:

 

 

पुणे शहरासह, कोंढव्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडत असताना, आता तर चक्क एका पुरुषाच्या आणि ते देखील एका पत्रकाराच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी हिसका मारून नेण्याची घटना कोंढवा पोलीस स्टेशन’च्या हद्दीत घडली आहे. याबाबत पत्रकार श्री अनिल चौधरी यांनी मोटारसायकल वरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. पी. वळवी तपास करत आहेत.

याबाबत पत्रकार अनिल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चौधरी हे रात्रीचे जेवण उरकून नेहमीप्रमाणे रात्री शतपावली करण्यासाठी रात्री दहाच्या दरम्यान बाहेर पडले असताना, काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर आलेल्या ट्रिपल सीट चोरट्यानी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या गळ्यात असलेली दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून चोरून नेली आहे.