मुख्यमंत्री  पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले, अलिबाग येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली घटना

0
810
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुन्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टरमध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.