​राज्यातील बंदिजनांना देणार मोफत शिक्षण-यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु

0
907
Google search engine
Google search engine

नाशिक : शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी त्यांच्या जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील बंदीजनांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येणाऱ्या विविध शिक्षणक्रमांविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, मुक्त विद्यापीठाचे अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात सुरु केलेले शिक्षणक्रम विद्याशाखानिहाय पुढीलप्रमाणे. 
मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे – प्रमाणपत्र- पूर्वतयारी शिक्षणक्रम, मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध असून दहावी/बारावी अनुत्तीर्ण किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना यासाठी प्रवेश घेता येईल. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा पदवी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. पदविका – वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन, मूल्य व अध्यात्मिक शिक्षण, पदवी- बी.ए. (मराठी, हिंदी उर्दू माध्यम), बी.ए. (वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन), बी.लिब. अँड आय.एस्सी., पदव्युत्तर पदवी – एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.लिब. अँड आय.एस्सी., 
वाणिज्य व व्यवस्थापन – पदविका- सहकार व्यवस्थापन, सहकार व्यवस्थापन (बँकिंग), डिप्लोमा इन अविएशन, हॉस्पीटॅलिटी अँड टॅ्व्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, पदवी – बी.कॉम. (मराठी, इंग्रजी माध्यम), सहकार व्यवस्थापन  पदव्युत्तर पदवी- एम.कॉम. (इंग्रजी, मराठी माध्यम), एमबीए (ह्युमन रिसोर्सेस/फायनान्स/मार्केटिंग/मॅन्युफॅक्चरींग), 
आरोग्य विज्ञान – प्रमाणपत्र- आरोग्यमित्र, रुग्ण सहायक, पदविका- योग शिक्षक, डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स (औद्योगिक शिक्षणक्रम), डिप्लोमा इन फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अॅण्ड पॅकेजिंग (औद्योगिक शिक्षणक्रम), डिप्लोमा इन लॅब टेक्निक, पदवी – बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स), पदव्युत्तर पदवी –  मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (एमपीएच).
निरंतर शिक्षण – प्रमाणपत्र- फायर अॅण्ड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, अरबी भाषा, ब्युटी पार्लर, शिवनशास्र, जलव्यवस्थापन, पदविका – इलेक्ट्रिशियन अॅण्ड डोमेस्टिक अॅप्लायन्सेस मेंटेनन्स, सिव्हील सुपरवायझर, इंटेरियर डिझायनिंग अॅण्ड डेकोरेशन, फिटर, सलून टेक्निक्स, फॅब्रिकेशन, कम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क टेक्निक्स, फायर अॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, अॅनिमेशन, पदवी – बी.एस्सी.इन – इंटेरिअर डिझाईन, फॅशन डिझाईन, हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅण्ड केटरिंग सर्व्हिसेस, हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट फॅसिलिटी सर्व्हिस, सिव्हील प्रॅक्टिस, ऑटोमोटिव्ह स्टडीज, फायर अॅण्ड सेफ्टी स्टडीज, मिडिया ग्राफिक्स अॅण्ड अॅनिमेशन, पदव्युत्तर पदविका – फायर अॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, 
शिक्षणशास्त्र – प्रमाणपत्र – बालसंगोपन आणि रंजन शिक्षण, आशययुक्त अध्यापन पद्धती, स्वयं-साहाय्य गट प्रेरक/प्रेरिका, शालेय स्तरावरील माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान, मूल्य शिक्षण, पदविका – शालेय व्यवस्थापन, पदव्युत्तर पदवी- एम.ए. (शिक्षणशास्त्र).
संगणकशास्त्र – प्रमाणपत्र – प्रोग्रामिंग एक्सपटा॔इज इन सी, डाटा स्ट्रक्चर युजिंग सी, उप्स अॅण्ड सी प्लस प्लस, प्रोग्रामिंग एक्सपटा॔इज थ्रू व्हिबी डॉट नेट, बिल्डींग वेब पोर्टल्स थ्रू एएसपी डॉट नेट, इंटरप्राईज सोल्युशन युजिंग जेटूईई, प्रोग्रामिंग एक्सलंस थ्रू सी शार्प, व्हिज्युअल प्रोग्रामिंग, ऑफिस टूल्स, लिनक्स, व्हिज्युअल बेसिक, ओरॅकल, कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकौंटींग, पदविका-  डिप्लोमा इन कॉम्प्युटिंग, डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सायन्स, पदवी – बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बी. एस्सी. इंडस्ट्रीयल सायन्स, 
शैक्षणिक सेवा विभाग – मानवी हक्क,  संमंत्रक प्रशिक्षण, पदविका – गांधी विचार दर्शन, पदवी – बी.ए. (ग्राहक सेवा), पदव्युत्तर पदवी – एम.एस्सी. (विषय संप्रेषण), एम.ए. (विषय संप्रेषण), एम.ए. (दूरशिक्षण), एम.ए. (शैक्षणिक संप्रेषण), 
विज्ञान व तंत्रज्ञान – पदवी – बी. एस्सी. (जनरल), बॅचलर ऑफ डिझाईन, बी.एस्सी. (अॅक्चुरिअल सायन्स), पदव्युत्तर पदवी – एम.एस्सी. (अॅक्चुरिअल सायन्स), एम.एस्सी. (मॅथेमॅटिक्स), एम.एस्सी. (एन्व्हायर्नमेंटल सायन्स).