​*राष्ट्रीय हायस्कूल येथे वृक्षारोपण संपन्न*

0
554
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-

*वृक्ष वल्ली आम्हा सोयरे* आज मानवाने स्वार्थापोटी वृक्ष तोड करून पर्यावरणाचा -हास केला.जिवन जगण्यासाठी वृक्षाची गरज ओळखून राज्यसरकारने आठ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला या अनुषंगाने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अनिलकुमार मदनगोपालजी चौधरी,प्रमुख अतिथी नगराध्यक्षा सुनिता नरेंद्र फीसके,सामजिक वनीकरणचे दिपक हिंगणीकर,सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अभिजित अहिरराव,नरेशजी खंडेलवाल,माणिक देशपांडे,शोभाताई मुगल,सुशिलाताई इंगळे,डाँ निलेश खंडेलवाल,विलास केचे,आदिवासी पर्यावरण संस्थेचे योगेश खानझोडे व प्रजापती आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी दिपक हिंगणीकर यांनी वृक्ष लागवडीचे महत्व तर योगेश खानझोडे यांनी वृक्षारोपण करतांना त्यांच्या संगोपनाचे महत्व पटवून दिले.नगराध्यक्षा सुनिताताई यांनी वृक्ष लावणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.सर्व मान्यवरांनी झाडे लावून पर्यावरणाच्या प्रती आपली जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद नैकेले,आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक सुनिल झंवर तर कार्यक्रमाचे संचलन पर्यवेक्षीका ममता तीवारी यांनी केले.यावेळी वर्ग आठवी च्या विद्यार्थ्यांनी आपले वर्गशिक्षक चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा संदेश देऊन सर्व वर्गखोल्यामध्ये कचरापेट्या दिल्या व वर्गप्रमुखांनी स्वच्छतेची जबाबदारी काटेकोर पणे पार पाडण्याचे आवाहन केले.