​!! पंढरीचा पांडुरंग देऊळगावी आला!! 

0
578
Google search engine
Google search engine

महेन्द्र महाजन जैन/ वाशीम/ बुलढाणा- 


                          गेल्या  साडेतीनशे वर्षांपासून  बुलढाणा जिल्हयाच्या देऊळगाव माळी येथे  व्यास पौर्णिमेच्या दुसय्रा दिवशी  दोनशे किलो दही  दुधाची दही हांडी फोडण्याची असलेली परंपरा या वर्षी देखील येथील  गोविंदा च्या भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात  जोपासली आहे. सालाबादाप्रमाणे या ही वर्षी देऊळगाव माळी येथील विठ्ठल मंदिरात  हा उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला.  या वेळी गोविंदा गोविंदा  च्या जयघोषात परिसर  दुमदुमून गेला होता. देऊळगाव माळी येथील संदिप  सखाराम मगर पाटिल  यांच्या परिवाराला  दहिहंडी  फोडण्याचा मान असतो. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  तुकाराम मगर अध्यक्ष श्री पांडुरंग संस्थान व विश्वस्त 

 देऊळगाव माळी  यांच्या मार्गदर्शनात होत असून या उत्सवाला फार महत्व आहे.  दोनशे किलो  दही दुधाची दही हांडी  विदर्भातील सर्वात मोठी दही हांडी असते. त्यानंतर सर्वात शेवटी हजारो भाविक भक्तानां संस्थान तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंढरपूर येथील यात्रा संपल्यानंतर  देऊळगाव माळी ला मोठ्या उत्साहात वाजत गाजत गोविंदा गोविंदा च्या गजरात  दही हांडी साजरी होत असते. जयंत पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त स्त्री  पुरुष अबाल वृद्ध मोठ्या नाचत गाजत भाग घेतात. दही हांडी च्या उत्सवाला एक मोठे सार्वत्रिक स्वरुप प्राप्त झाले असले तरी ही देऊळगाव माळी येथील  दही हांडी उत्सव शेकडो वर्षा पासून   येथे नित्य नियमाने साजरा होत आहे.दही   हांडी विदर्भातच नव्हे  राज्यात एक आगळी वेगळी असावी हा कार्यक्रम आपल्यात एक वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारा कार्यक्रम  असतो  हे विशेष.