​वडनेरगंगाई अन् येवद्याच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करा -प्रहार जनशक्तीची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे मागणी

0
615

दर्यापूर तालुक्यातील येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्र येत असून परिसराची लोकसंख्या ४२ हजाराच्या आसपास आहे. परंतु एखाद्या साथीचा प्रकोप आल्यास येथे आरोग्य सेवेचा फज्जा उडत असल्याने याचा रुग्णांना त्रास होत आहे. म्हणून वडनेरगंगाई येथे असणाºया आरोग्य उपकेंद्राचे रुपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करुन येवदा ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हासंपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली आहे.


सध्या पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली असून या दिवसात साथीची लागण मोठ्या प्रमाणात असते. वडनेरगंगाई आरोग्य उपकेंद्र असून येथील परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उपकेंद्रात उपचारासाठी क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण सरासरी आंतर रुग्ण भरती असतात. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णसेवा सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्यामुळे वडनेरगंगाई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे. वडनेरच्या आरोग्य उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणीवर्धन करण्यासोबतच मोठ्या लोकवस्तीच्या येवदा गावाच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव प्रहार जनशक्तीपक्षाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सादर केला आहे. तसेच याबाबत जिल्हा  आमदार बच्चू कडू,मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी, आमदार रमेश बुंदिले,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, वैद्यकीय अधिकारी यांना लेखी निवेदनाव्दारे कळविले आहे.