मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

1005

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कडून घेतलेले कर्ज माफ करावे अशी राज्यभरातून मागणी होत आहे . त्यानुसार ते  आज सामाजिक न्याय विभागाच्या झालेल्या बैठकीत  मागासवर्गीय महामंडळ चे एकूण 635.99 कोटी कर्ज असल्याची  माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करावे या साठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागस्वर्गीयांच्या कर्ज माफी चे निवेदन देणार आहोत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली. सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे आज सामाजिक न्याय मंत्रालयाची विविध विषयांवर बैठक झाली . त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ चे कर्ज माफ करावे तसेच मागासवर्गीय औद्योगिक संस्थांवरील कारवाई स्थगित करण्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात आज बैठक झाली. मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ चे 162 महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ चे 239 कोटी लिंडकोम 68.79 कोटी ओबीसी महामंडळ चे 85 कोटी अपंग विकास महामंडळ चे 37.06 कोटी आदिवासी विकास महामंडळ चे 32 कोटी असे एकूण 635. 99 कोटी रुपयांचे कर्ज थकबाकी आहे. हे मागसवर्गीयांचे सर्व कर्ज शासनाने माफ कारवे यासाठी आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे कर्ज माफ करण्याची मागणी करणार आहोत असे यावेळी रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच 372  मागासवर्गीय औद्योगिक संस्थांपैकी 132 संस्थावर  लेखा समितीने अपहाराचा ठपका ठेवला असून त्यापैकी 40 संस्थावर गंभीर गुन्हा दाखल आहे. उर्वरित 92 संस्थांवर कारवाई शिथिल करावी त्यांना नव्याने संधी देण्यात यावी असे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेस प्रशांत रोकडे (आय. आर. एस) प्रवीण मोरे, हेमंत रणपिसे आदी तसेच रिपाइं चे महाराष्ट्र अध्यक्ष भुपेश थुलकर, राज्य सरचिटणीस राजा सरवदे, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात