चांदुर रेल्वेत अवैध रेती वाहतुक करणारे १५ ट्रक जप्त -रेती माफीयांचे धाबे दणाणले

0
582
Google search engine
Google search engine

एसडीओ डॉ. वनश्री लापसेटवार यांच्या आदेशाने राबविली धडक मोहीम

रेतीच्या ट्रकांनी तहसिल परीसर ‘फुल्ल’

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)


शहरातुन अवैध रेतीची वाहतूक जोमात सुरू असतांना उपविभागीय अधिकारी डॉ. वनश्री लापसेटवार यांच्या आदेशाने गुरूवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल १५ ट्रक जप्त करून कारवाई करण्यात आली.
शहरातुन अमरावतीकडे दररोज अवैध रेतीचे अनेक ट्रक जात होते. नव्यानेच रूजु झालेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. वनश्री लापसेटवार यांनी याकडे लक्ष देत धडक मोहिम राबविण्याचे आदेश पथकाला दिले. यामुळे गुरूवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी ६ वाजता तहसिलदार बी.ए. राजगडकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या मोहिमेत शहरातील सिटी पॉईंट व अमरावती बायपास रोडवरील रेल्वे गेटजवळ एमएच ०६ के ८०८०, एमएच ३४ ऐबी ४०२८, एमएच २७ एक्स ८६१, एमएच ०६ एसी ११६८, एमएच १४ व्ही ५६०७, एमएच ३४ एम १०६८, एमएच २० एटी ५८६८, एमएच १४ व्ही ५६३४, एमएच ०४ एएस ८१२२, एमएच २७ एक्स ५५८८, एमएच २७ एक्स ५१२५, एमएच २७ एक्स ८२३३, एमएच २७ एक्स ७५२९, एमएच ०४ डीके ६६९०, एमएच ३४ एम १२५५ असे १५ ट्रक जप्त केले. जप्त केलेल्या ट्रकांमध्ये असलेल्या रेतीचे कागदपत्रे तपासणीसाठी बाबुळगाव येथील तहसिलदार यांना पाठविण्यात आले असुन त्यानंतर या ट्रकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसिलदार बी.ए. राजगडकर यांनी दिली..
या मोहिमेत तहसिलदार बी.ए. राजगडकर यांच्यासह निवासी नायब तहसिलदार बबनराव राठोड, तलाठी मुकुंद सुडके, वानकर, पठान, वंजारी, धोटे, भांगे आदींचा सहभाग होता. दोन दिवसांत तब्बल १५ ट्रक जप्त करून तहसिल परीसरात लावल्यामुळे परीसर फुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच अवैध रेती वाहतुक करणाऱ्या चांदुर रेल्वे तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातील रेती माफीयांचे धाबे दणाणले असुन या अगोदरसुध्दा अवैध रेती वाहतुक करणारे शेकडो ट्रक तहसिलदार राजगडकर यांनी पकडुन त्यांच्याकडुन लाखो रूपयांचा महसुल शासन दप्तरी जमा केलेला आहे. यामुळे जिल्ह्यावर आज तरी तहसिलदार राजगडकर अभिनंदनास पात्र ठरले आहे.