फिनले मीलमध्ये मीलकामगारांच्या विविध मागण्या लागल्या मार्गी – मेहनत करे मुर्गा अंडा खाये फकीर म्हणी प्रमाणे श्रेय घेण्याचे प्रयत्न

0
727



अचलपूर /श्री प्रमोद नैकेले /-

अचलपूर शहराचे वैभव विदर्भ मील प्रशासनाचे दुर्लक्षामुळे बंद पडला शेकडो कामगार बेरोजगार झाले.भारताच्या राष्ट्रपती पदावर महामहीम प्रतीभाताई पाटील विराजमान झाल्या त्यांच्या प्रयत्नाने पुन्हा अचलपूरचे भाग्य उजाडले 1 जानेवारी 2011 रोजी फिनले मील अचलपूर येथे सुरू झाला तेंव्हा सुध्दा श्रेयवाद निर्माण झाला मात्र अचलपूर तालुका व आसपासच्या ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले म्हणून श्रेय घेणा-या कडे विशेष कुणी लक्ष दिले नाही.परंतु या मील मध्ये नव्याने लागलेल्या कामगारांच्या प्रश्नावर कुणाचेच लक्ष राहिले नाही त्यामुळे त्रस्त कामगारांनी स्वताची गिरणी कामगार सभा फिनले मील नावाने संघटना स्थापन केली व समस्यांना शासन व प्रशासन दरबारात मांडू लागले.त्यांना या कामात ब-यापैकी यश आले व पुढे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण येथे सुध्दा यशाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू होवून कामगारांच्या प्रश्नावर राजकारण होतं असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अभय माथने यांनी म्हटले आहे.
 गिरणी कामगार सभा अचलपूर यांनी अनेक वर्षांपासून कामगारांच्या विविध समस्यावर आंदोलने,निदर्शने व निवेदने देवून बरेच प्रश्न मार्गी लावून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले ज्यामध्ये त्यांना मानव अधिकार सुरक्षा परिषद (गैर सरकारी संघटन) चे शहर अध्यक्ष नरेश तायवाडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रीतेस अवघड,विवेक महल्ले व सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले व आज कामगारांच्या बोनस,ई.एस.आय.सी व भविष्य निर्वाह निधी याबाबत च्या समस्या सोडवण्यात आल्या कामगार अधिनीयमानुसार आता येथील कामगारांना बोनस मीळतो,त्यांची भविष्य निर्वाह निधी नियमानुसार जमा होते व त्यांना अपघाती विमा व उपचारासाठी सुविधा प्राप्त झाली.सध्या शहरातील प्रसिध्द दवाखान्यात त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे व काही दिवसात स्वतंत्र उपचारकक्ष मिळून दोन डाँक्टरांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन सुध्दा त्यांना प्राप्त झाले आहे याशिवाय काही समस्या बाकी आहेत त्यामध्ये कित्येक दिवसांपासून अस्थाई कामगार म्हणून काम करणा-या कामगारांना स्थायी करने,मील मध्ये एका वर्षातच स्थायी कामगारांचा दर्जा मिळावा,किमान वेतन अधिनियम 1948 च्या कलम 14 नुसार ओव्हरटाईम व कलम 3(2) नुसार किमान वेतन व भत्ते मिळावे,त्यांना किरकोळ रजा लागू कराव्यात,शासकीय व स्थानीक सुट्यांचा पगार त्यांना मिळावा व कार्यरत कामगारांच्या वेतनात नियमानुसार वेतनवाढ मिळावी या व अश्या अनेक मागण्या गिरणी कामगार सभेने शासन दरबारी रेटून धरल्या आहेत.त्यांनी स्वतः या मागण्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यालय व अधिकारी वर्गापर्यंत पोहोचवून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत असे संघटनेचे अध्यक्ष अभय माथने,मनसेचे प्रितेश अवघड व मानव अधिकार सुरक्षा परिषद शहर अध्यक्ष नरेश तायवाडे व सर्व कार्यकर्ते यांनी सांगितले आहे तसेच आमच्या प्रयत्नांचे श्रेय कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये व कामगारांच्या भविष्यासोबत राजकारण करू नये असे करून कामगारांच्या अधिकारावर संकट आणु नये असे झाल्यास कामगारांच्या हितासाठी आम्ही मागे सरणार नाही असा इशारा त्यांनी दिला.