मोप येथे कृषी महाविद्यालय रिसोडच्या वतीने वृक्षारोपन

0
595
Google search engine
Google search engine



रिसोड / महेंद्र महाजन जैन-

                   आज १जुलै रोज शनिवार कृषी दिनाचे औचित्य साधुन श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे वृक्षारोपन करण्यात आले.
               आजच्या या निसर्गाच्या लहरीपणाला जबाबदार म्हणजे असंख्य वृक्षतोड झालेली आहे.वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात घेऊन कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थ्यानी प्रा.ए.बी.फुके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.डाॅ.गोपीकिसन सिकची अध्यक्ष शिक्षण समिती मोप यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.त्याच बरोबर श्री.वरघट सर मुख्याध्यापक जि.प.मोप,प्रा.समाधान गायकवाड,श्री.संतोष भुरकाडे सर,श्री.अतुल राजुरकर सर,श्री.विशाल बोडखे सर,श्री.सिकवाल बाबुजी,श्री.बंडुजी केचकर बाबुजी शिवाजी विद्यालय मोप,श्री.काळे सर जि.प.मोप सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.डाॅ.गोपीकिसन सिकची साहेब यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व यावर कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ए.बी.फुके यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश रेड्डी,विश्वजीत देशमुख,जगदिश कुमार, विजय चंन्द्रा,किरण कुमार राजु इ.विद्यांर्थ्यानी परिश्रम घेतले.